मोठी बातमी....मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपालिकेतील सफाई कामगारांना ब्लॅंकेट वाटप.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला /प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा मा.आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ७ जानेवारी रोजी
सांगोला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून सांगोला नगरपालिकेतील सफाई कामगारांना उबदार ब्लॅंकेट वाटप करण्यात आले हे ब्लॅंकेट नगरपालिकेतील १३१ सफाई कामगारांना देण्यात आले आहेत.
सध्या हिवाळा सुरू असून दिवसेंदिवस थंडी मध्ये वाढ होत असल्याने वाढत्या थंडीपासून बचावासाठी सफाई कामगारांना उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले
या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाला सांगोला नगरपालिकेचे गटनेते सचिन उर्फ सोमनाथ लोखंडे, भा.ज.पा पुणे शहर चे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रतीक खताळ, उद्योगपती दिलीपकाका मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
सांगोला तालुका महिला कार्याध्यक्ष सुचिताकाकी मस्के, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागासवर्गीय आघाडीचे सांगोला ता.अध्यक्ष चंचल बनसोडे, सोमनाथ ठोकळे
, नागेश लोखंडे, सोमनाथ बनसोडे, महादेव बनसोडे, सुरज मुलाणी, ठेकेदार श्री.शेट्टी यांच्यासह सांगोला नगरपालिकेतील विविध विभागातील प्रमुख तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट:- शिकवण दिपकआबांची आणि
उपक्रम सांगोला शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे.!
जगभरामध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मध्ये आरोग्य आणि सफाई याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे सर्वांना कळाले असून आपल्या जीवाची पर्वा न करता
अहोरात्र कष्ट करणाऱ्या व जिल्ह्याभरासह राज्यात सांगोला नगरपालिकेला स्वच्छता व सफाईबाबत मानांकन मिळवून देणाऱ्या सफाई कामगारांना थंडीच्या दिवसांमध्ये उब मिळावी
व व त्यांच्या आरोग्याची काळजी व्हावी या हेतूने सांगोला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दीपक आबा यांच्या संस्कारातून हे उबदार ब्लँकेट वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
सोमनाथ उर्फ सचिन लोखंडे.
गटनेते तथा मा. नगरसेवक सांगोला नगरपालिका.


0 Comments