google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महत्त्वाकांक्षी म्हैशाळ योजनेत ८ वंचित गावांसह ४ तलावांचा नव्याने समावेश - आमदार शहाजी बापू पाटील कोरडा नदीवरील सर्व को.प बंधारे वर्षातून २ वेळा अधिकृतरित्या भरणार

Breaking News

महत्त्वाकांक्षी म्हैशाळ योजनेत ८ वंचित गावांसह ४ तलावांचा नव्याने समावेश - आमदार शहाजी बापू पाटील कोरडा नदीवरील सर्व को.प बंधारे वर्षातून २ वेळा अधिकृतरित्या भरणार

महत्त्वाकांक्षी म्हैशाळ योजनेत ८ वंचित गावांसह  ४ तलावांचा नव्याने समावेश


- आमदार शहाजी बापू पाटील कोरडा नदीवरील सर्व को.प बंधारे वर्षातून २ वेळा अधिकृतरित्या भरणार

  (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (वार्ताहर) म्हैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये पूर्वी घेरडी सोनंद व पारे या तीनच गावांचा समावेश होता परंतु आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून नवीन ८ वंचित गावांचा समावेश केला

 असून आता म्हैशाळ योजनेमध्ये एकूण ११  गावांचा समावेश झाला आहे. घेरडी, सोनंद, पारे या जुन्या तीन गावांसह वाकी घेरडी, 

वाणी चिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी, तरंगेवाडी, भोपसेवाडी, जवळा व आगलावेवाडी या ८ गावांचा नव्याने समावेश होऊन एकूण ११ गावांबरोबर पारे, हंगिरगे, जवळा व नराळे येथील ४ ल.पा तलाव भरण्यात येणार आहेत

 यासाठी शासन निर्णय झाला असून या सर्व गावांना ३५० एमसीएफटी पाणी अधिकृत मंजूर झाले आहे अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. 

याचबरोबर म्हैशाळ योजनेतून कोरडा नदीवरील गळवेवाडी ते वाढेगाव पर्यंत असणारे १३ को.प बंधारे वर्षातून दोन वेळा भरून घेण्याकरिता २०० MCFT पाणी मंजूर झाले आहे. 

यामुळे गळवेवाडी, सोनंद, जवळा, कडलास, आलेगाव, मेडशिंगी ते वाढेगाव अश्या ७ गावांना याचा मोठा फायदा होणार आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

म्हैशाळ योजनेतील ११ गावांना बंदिस्त नलिकेतून पाणी देण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार होत असून लवकरच निविदाप्रक्रिया राबवून येत्या दोन

 महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

         राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील सर्व वंचित गावातील शेतकऱ्यांना म्हैशाळ योजनेतून पूर्वीचे ८०० MCFT व नवीन ५५० MCFT असे एकूण १.३५० TMC पाणी मंजूर झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments