google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...पतीसारखा दिसत होता मुलगा, म्हणून केली हत्या; खुनी आईची धक्कादायक कबुली

Breaking News

खळबळजनक घटना...पतीसारखा दिसत होता मुलगा, म्हणून केली हत्या; खुनी आईची धक्कादायक कबुली

 खळबळजनक घटना...पतीसारखा दिसत होता


मुलगा, म्हणून केली हत्या; खुनी आईची धक्कादायक कबुली

गोव्यात ४ वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठ  ने पोलीस तपासात धक्कादायक कबुली दिली आहे. ती गोव्याला पर्यटनाला यासाठी गेली होती की, तिचा पती वेंकटरमन आपल्या मुलाला भेटू शकणार नाही.

त्याचबरोबर सूचनाने आपल्या मित्रांना व कुटूंबातील सदस्यांना सांगितले होते की, तिचा मुलगा चिन्मय हुबेहुब पतीसारखा दिसतो व वारवार त्याची आठवण करून देतो. 

त्याचबरोबर पोलीस तपासात गोष्ट समोर आली आहे की, मुलाचे वडील वेंकटरमन यांनी शनिवारी सूचनाला कॉल केला होता. त्याने मुलासोबत वेळ घालवण्यासाठी त्याला बेंगळुरूमधील राजाजीनगर येथील

 आपल्या घरी आणण्यास सांगितले होते. मात्र सूचनाने पतीच्या घरी जाण्यास नकार दिला होता. तिने पतीला सांगितले होते की, तो मुलाला बेंगळुरूमधील सदाशिवनगरमधील सार्वजनिक ठिकाणी मुलाला भेटू शकतो.

सुचना व वेंकटरमन यांनी २०१० मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना मुलगा झाला. २०२० पासून दोघांमध्ये वाद होऊ लागले व २०२२ पासून घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. तेव्हापासून सुचना आपल्या पतीचा तिरस्कार करत होती. 

घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर मुलाचा ताबा आईकडे म्हणजे सूचनाकडे आला. तेव्हापासून ती वेंकटरमनला मुलाला भेटू देत नव्हती. 

त्यानंतर वेंकटरमन यांनी पुन्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्यावर न्यायालयाने नुकतेच आदेश दिले की वेंकटरमन आपल्या मुलाला दर रविवारी भेटू शकतील.

ठरल्याप्रमाणे वेंकटरमन मागील रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून सदाशिवनगरमध्ये थांबले होते. पण सूचना मुलला घेऊन आली नाही. 

त्यांनी तिला फोन, मेसेज केले पण तिने उत्तर दिले नाही. दोन तास थांबून ते कामानिमित्त इंडोनेशियाला गेले. 

सुचनाने मुलाचा गोव्यात खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक भयंकर प्लॅन रचला होता. मात्र, ती त्यामध्ये यशस्वी झाली नाही आणि ती पकडली गेली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्याहून बंगळुरूला जात असताना सूचना चार तास वाहतूक कोंडीत अडकली व तिचा प्लॅन पूर्ण फसला. 

जर ती वाहतूक कोंडी नसती तर कदाचित सुचना बंगळुरूपर्यंत पोहोचली असती आणि तिचा प्लॅन पूर्ण केला असता झाली होती. पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला फोन करून सतत

 सूचना दिल्या व गाडी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. तिला संशय येऊ नये म्हणून चालक कोकणी भाषेत बोलत राहिला. कॅब चालक गाडी नेमकी कुठे घेऊन चालला आहे, 

यांचा सूचनाला थांगपत्ता नव्हता. जेव्हा गाडी पोलीस ठाण्यासमोर आली तेव्हा तिला धक्का बसला. कर्नाटक पोलिसांनी तिच्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये चार वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला.

Post a Comment

0 Comments