मोठी बातमी...पंढरपूर येथे होणाऱ्या ओबीसी महामेळाव्याच्या
नियोजनासाठी सांगोला येथे आज बैठक
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- पंढरपूर येथे ६ तारखेला होणाऱ्या ओबीसी महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी ओबीसी समाज बांधवांची हॉटेल ब्लू डायमंड
मिरज रोड सांगोला येथे आज मंगळवार दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ठीक १ वाजता नियोजन बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
यावेळी आ. गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीस ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. बाळासाहेब एरंडे, श्री. मारुती आबा बनकर, श्री. परमेश्वर कोळेकर,
श्री. शिवाजीनाना बनकर, श्री. आनंदा माने, श्री. बिरुदेव शिंगाडे, दत्तात्रय जानकर, श्री. दत्ता चव्हाण, सोमनाथ गवळी, मधुकर बनसोडे, संतोष करांडे यांनी केले आहे.
0 Comments