सांगोला ता. लक्ष्मीनगर स्मशान भूमीतील हायमास्ट तात्काळ चालू न केल्यास,
रात्री मयत झाल्यास अंत्यविधी ग्रामपंचायत पुढे करणार ; कैलास हिप्परकर लक्ष्मीनगर
सांगोला तालुक्याचे फेमस आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहूद गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर ग्रामपंचायत अंडर खाली असलेल्या स्मशान भूमी मध्ये ४ ते ५ वर्षापूर्वी हायमास्ट बसवला आहे
परंतु लाईट कनेक्शन अध्याप जोडलेलेच नाही विशेष गंभीर बाब म्हणजे स्मशानभूमीसाठी हायमास्टच्या माध्यमातून सदर ठिकाणी उजेडाची सोय व्हावी म्हणून तरतुदीनुसार कोणती व्यवस्था अद्यावत नाही
परंतु सरपंच/ ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्याच्या संगनमताने स्वतःच्या स्वार्थापोटी मात्र कागदावरती हे काम पूर्ण दाखवून गावच्या नागरिकांची गैरसोय केलेली आहे
तरी या प्रकरणाची सुद्धा चौकशी व्हावी, त्या ठिकाणी हायमास्ट बसल्यापासून वारंवार ग्रामपंचायतला विनंती करून सुद्धा आजतागायत त्या ठिकाणी लाईट कनेक्शन जोडले नाही
त्याकडे जाणून बुजून तरी दुर्लक्ष केले जात नाही ना आसा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे हायमास्ट असून आडचण आणि नसून खोळांबा, मात्र लोकांच्या मृत्यू समय खेळ खंडोबा अशा म्हणीप्रमाणे गत झाले आहे.
स्मशान भूमीच्या आसपास झाडे झुडपे असल्यामुळे त्या ठिकाणी अंत्यविधीस गेलेल्या नागरिकांना साप विंचू चावून जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
गावापासून दूर अंतरावरती स्मशानभूमी असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रात्रीचा प्रकाश येत नाही रात्री आप रात्री गावच्या नागरिकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून
मयत झालेल्या व्यक्तीचा त्या ठिकाणी अंत्यविधी करावा लागतो जर का साप विंचू चावून एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार
का असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे राजकीय दबावामुळे गावातील कोणताही नागरिक आवाज उठवण्यास तयार होत नाही , लक्ष्मीनगर गावचे ग्रामसेवक कामामध्ये नेहमी असमर्थता दाखवत
असून गल्लीबोळा मध्ये मात्र याविषयाची रात्रीचे मयत झाल्यास कुजबूज चालू असते, गेली ४ ते ५ वर्षापासून लाईट कनेक्शन विना बंद असलेला हायमास्टची लाईट 2024 मध्ये तरी चालू होणार
का याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे, लक्ष्मीनगर स्मशान भूमीतील हायमास्ट तात्काळ चालू न केल्यास, पंधरा दिवसाच्या आत लाईटची
सुविधा ग्रामपंचायतकडून उपलब्ध न झाल्यास रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत अंत्यविधी न करता ग्रामपंचायत कार्यालयापुढे केला जाईल असा इशारा लक्ष्मीनगर गावचे सुज्ञनागरिक कैलास हिप्परकर यांनी दिला आहे,
तसेच सामाजिक काम करत आसताना कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव निर्माण करून नये, तसे झाल्यास किंवा गावात अनुसुचीत प्रकार घडवल्यास ,
घडवून आणल्यास त्या सर्व घटनेस ग्रामपंचायतचे तत्काळ सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य ,लक्ष्मीनगर, तसेच पंचायत समिती सांगोला बिडिओ हे जबाबदार राहतील .
0 Comments