खळबळजनक घटना.. सांगोला येथे ग्रामसेवक यांच्या पत्नीच्या गळ्यातील
१२ ग्राम सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून दोन अनोळखी इसम सुसाट
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- वॉकिंगला पायी चालत निघालेल्या तीन महिला घराकडे परत येत असताना समोरून दुचाकी वरून आलेल्या ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने ग्रामसेवक यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे ६८ हजार रुपये
किमतीचे १२ ग्राम सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून सुसाट वेगाने धूम ठोकली. ही घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास वासुद ते सांगोला रोडवरील माणिक पवार याचे घराजवळ घडली.
याबाबत विद्या बाळासो शिंदे (रा. नरेंद्र नगर. वासुद रोड सांगोला) यांनी त्या दोन अनोळखी इसमांविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी विद्या शिंदे ह्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुगला इंगवले व स्वाती बाबर अशा तीन महिला मिळून २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास
नेहमीप्रमाणे घरातून पायी चालत नरेंद्रनगर ते सांगोला कॉलेजकडे जाणारा रस्त्याने बंडु केदार याचे घरापर्यंत गेले तेथून माघारी परत घरी येत असताना माणिक पवार यांचे घराचे जवळ रोडवर
सायंकाळी ५:४५ च्या सुमारास समोरून सांगोला कडून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेले दोन अनोळखी इसम अचानक त्यांच्या बाजुला वळले व फिर्यादी विद्या शिंदे यांना काही समजण्याच्या आत दुचाकीवर पाठीमागे
बसलेल्या इसमाने त्यांच्या गळयातील १२ ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र हाताने जबरदस्तीने हिसका मारून तोडुन चोरी करून दोघांनी दुचाकीवरून जुना कॉलेज रोडने धूम ठोकली.
सदर प्रकार घडल्यानंतर विद्या शिंदे यांनी आरडा ओरडा केला परंतु ते दोघेजण खूप दूर निघून गेल्याने सापडले नाहीत असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
0 Comments