google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...मुलाच्या हळदीत नाचताना घात झाला सोलापूर जिल्ह्यातील दुर्घटना

Breaking News

धक्कादायक प्रकार...मुलाच्या हळदीत नाचताना घात झाला सोलापूर जिल्ह्यातील दुर्घटना

 धक्कादायक प्रकार...मुलाच्या हळदीत नाचताना घात


झाला सोलापूर जिल्ह्यातील दुर्घटना

सध्या सोलापूर जिल्ह्यात लग्न सोहळे मोठ्या आनंदात साजरे केले जात आहेत. मात्र लग्न सोहळ्या दरम्यान एक दुर्घटना घडली आहे.

 मुलाच्या लग्नाच्या वरातीत बापाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सुभाष देवमारे असे मयत पित्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हळदीच्या मंडपात शोककळा पसरली आहे.

 याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पंढरपुरातील सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज दुपारी लग्न सोहळा आयोजित केला होता.

 दरम्यान काल रात्री डॉल्बीच्या दणदणाटामध्ये नवरदेवाची हळदीची वरात सुरू होती. ही वरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचली. 

वरात आल्यानंतर डॉल्बीच्या प्रचंड कर्कश आवाजामुळे वधू पिता सुभाष हे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला.

 डॉल्बिच्या कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. लग्नाच्या दिवशीच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने अमितने टाहो फोडला.

Post a Comment

0 Comments