google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका शहर वाहन चालक मालक संघटनेतर्फे ११जानेवारी पासुन चक्काजाम आंदोलन श्री हरिभाऊ गायकवाड

Breaking News

सांगोला तालुका शहर वाहन चालक मालक संघटनेतर्फे ११जानेवारी पासुन चक्काजाम आंदोलन श्री हरिभाऊ गायकवाड

 सांगोला तालुका शहर वाहन चालक मालक संघटनेतर्फे ११ जानेवारी


पासुन  चक्काजाम आंदोलन श्री हरिभाऊ गायकवाड

उद्यापासुन सांगोला तालुका शहर वाहन चालक मालक संघटनेतर्फे चक्काजाम श्री हरिभाऊ गायकवाड 

सांगोला प्रतिनिधी ( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

दि.10जानेवारी 2024 रोजी सांगोला तालुका व शहर वाहन चालक मालक संघटनेची बैठक चैतन्य ऑटो बाजार मधील पटांगणात बोलावणेत आली 

त्यावेळी ग्रामीण व शहरी भागात असलेल्या अनेक लहान मोठ्या चाकाचे वाहन चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शासन जो पर्यंत काळा कायदा बंद करणार नाही

 तो पर्यंत रस्त्यावर एकही वाहन चालणार नाही असा निर्णय घेण्यात आला कोणी चालकाने आपले वाहन रस्त्यावर येऊ नया गोष्टीची काळजी घ्यावी, आपण येथे कोणतेच वाहन रस्त्यावर येऊ देणार नाही 

असा साघटनेने इशारा दिला आहे. ग्रामीण वाहन चालक मालक संघटने कडून 11 जानेवारी ला सकाळी 10 वाजता पासून सांगोला येथे सर्व रोड वर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे 

तरी या आंदोलनात समस्त चालक बंधूनी स्टेरींग बंद ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे जिल्ह्यातील संपूर्ण वाहन बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे.

केंद्र शासनाने 'हिट अँड रन, 'चुकीचा कायदा अमलात आणला, तो चालकान करिता एक मोठा शाप आहे,

 चालकास परिवाराचे पालन पोषण होत नाहीत इतका पगार त्यांना मिळतो तर पगार शिल्लक कुठून पडेल आणि अपघात झाल्यावर सात लाख

कुठून द्यायचे, ज्या काही मालकांच्या गाडीची किंमतच चार ते पाच लाख रुपये असते याची सुद्धा जान सरकारला नसावी हि किती मोठी शोकांतिका आहे,

 मंत्र्यान कडे पन्नास, लाख एक लक्ष किमतीच्या गाड्या आहे त्यांना सर्वसामण्याच्या परिस्थितीची काय? जान! असेल या वरून स्पष्ट दिसून येत आहे असे

 चुकीचे निर्णय घेत असेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार काय असे मत चालक मालक वाहन संघटनेने केले आहे जो पर्यंत हा काळा कायदा रद्द करणार नाही 

तो पर्यंत एकही वाहन रस्त्यावर धावणार नाही असा निर्धार संघटनेने केला आहे तर असेच आंदोलन संपूर्ण भारतात होणार असून प्रत्येक चालकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

 संघटनेचे अध्यक्ष श्री हरिभाऊ गायकवाड यांनी केले  आहे. यावेळी श्री सचिन शिनगारे यांचे सह ट्रान्सपोर्ट चालक रोडलाईन्स चालक-मालक पत्रकार नुर  मणेरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments