google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! 'अभ्यास कर' म्हटल्याचा राग मनात धरून दहावी शिकत असलेल्या मुलाने उचलले धक्कादायक पाऊल; आईने घेतला धसका सोलापूर जिल्ह्यातील घटना

Breaking News

धक्कादायक ! 'अभ्यास कर' म्हटल्याचा राग मनात धरून दहावी शिकत असलेल्या मुलाने उचलले धक्कादायक पाऊल; आईने घेतला धसका सोलापूर जिल्ह्यातील घटना

 धक्कादायक ! 'अभ्यास कर' म्हटल्याचा राग मनात धरून दहावी शिकत असलेल्या


मुलाने उचलले धक्कादायक पाऊल; आईने घेतला धसका सोलापूर जिल्ह्यातील घटना
 

‘अभ्यास कर’ म्हटल्याचा मनात राग धरून दहावी शिकत असलेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५:३० ते ११:३० वाजे दरम्यान आगळगाव (ता. बार्शी) शिवारात घडली.

सुमित विष्णू मोहिते (वय १६, रा. आगळगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत चुलते आप्पासाहेब दत्तात्रय मोहिते (वय २७, रा. आगळगाव) यांनी बार्शी तालुका पोलिसात खबर दिली आहे.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, सुमित तू दहावीला आहेस, तुझी परीक्षाजवळ आली आहे. तू अभ्यास कर असे आईने म्हटले. तो देवळाकडे बसलेल्या मित्रांकडे जाऊन येतो असे सांगून बाहेर पडला. घरी उशिरापर्यंत न परतल्याने गावामध्ये शोध घेण्यात आला.

शेतामध्ये शोध घेतला असता आंब्याच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले, याबाबत बार्शी तालुका पोलिसात आकस्मिक मयताची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अमित घाडगे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments