google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...आमदार शहाजी बापू पाटलांनी या निकालावर प्रतिक्रिया देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही मोठं विधान

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...आमदार शहाजी बापू पाटलांनी या निकालावर प्रतिक्रिया देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही मोठं विधान

 ब्रेकिंग न्यूज...आमदार शहाजी बापू पाटलांनी या निकालावर


प्रतिक्रिया देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही मोठं विधान

निकाल बाजूने लागला अन् आमदार शहाजीबापू पाटील यांचा कॉन्फिडन्स दसपटींनी वाढला; राष्ट्रवादीचाही 'रिझल्ट'च सांगितला..'महाराष्ट्राला समाधानकारक देणारा हा निकाल ठरला आहे...'

 शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल विधानसभा अध्यक्ष जाहीर करण्यात आला. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत

 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे.याचवेळी त्यांनी सुनील प्रभूंची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही चुकीची ठरवली.

तसेच भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य असल्याचा निर्णयही दिला. आता या निकालानंतर शिंदेंच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगरने 

फेमस झालेले आमदार शहाजी बापू पाटलांनी या निकालावर प्रतिक्रिया देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही मोठं विधान केले आहे.

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील  यांनी राहुल नार्वेकरांच्या निकालावर बुधवारी भाष्य केले. ते म्हणाले, देशातील सर्वच विधिमंडळाला पथदर्शी ठरणारा हा निर्णय आहे.

 घटनेनुसार कायद्याचे सर्व बारकावे पाहूनच सभापती नार्वेकरांनी आजचा हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. महाराष्ट्राला समाधानकारक देणारा हा निकाल ठरला आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही हाच निर्णय लागू होईल असा गौप्यस्फोटही निकालावर प्रतिक्रिया देताना सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.

आजच्या सभापती राहुल नार्वेकरांनी  दिलेल्या निकालाबाबत बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले,गोंधळ घालून कायदा बदलता येत नसतो.

कायदा हा कायदाच असतो हे सभापती नार्वेकरांनी कायद्याच्या सर्व चौकटीत राहून, त्याचे बारकावे पाहून हा निकाल दिला आहे.

सभापती नार्वेकरांनी शिवसेनेचा दिलेला हा निकाल तमाम महाराष्ट्राला समाधान वाटणार आहे. हा निकाल म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीला न्याय देणारा निकाल आहे.

 उद्धव ठाकरेंनी दोनवेळा सादर केलेली घटना ही हुकूमशाही पद्धतीची, खाडाखोडीची, लबाडीच्या गोष्टी असल्यामुळे ही निवडणूक आयोगाने मान्य केली नाही. 

हा निकाल म्हणजे सभापती नार्वेकरांचा कायदेतज्ञ असलेला निकाल दिसून येतो. जे विरोधक म्हणत होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार आहेत.

आजच्या निकालामुळे त्यांना कायद्याने दिलेली एक मोठी चपराकच आहे. या निकालामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

 या निकालामुळे सतत बोलणाऱ्या विरोधकांना लबाड आणि खोटे कसे आहेत हे दाखवून दिले आहे. आज त्यांची पत महाराष्ट्राच्या जनतेसमोर राहिली नाही.

महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करायची, महाराष्ट्रातील जनतेवर सतत दबाव ठेवायचं आणि राजकारण गढूळ बनवायचं या उद्योगासाठी संजय राऊत आणि

 उद्धव ठाकरे  हे सरकार पडायचं यासाठी तारखा देत होते आणि गोंधळ घालत होते. महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असेही बापू म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमकुवत वाटायला लागल्याने कणखर नेतृत्व असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकटी करण्यासाठी आम्ही सर्वांनी वेगळा निर्णय घेतला. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही हाच निर्णय लागू होईल असं मला वाटते असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments