google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ... "पिल्लू दोन मिनिटं सहन कर, जास्त त्रास होणार नाही", प्रियकराने केले प्रियसीसोबत भयानक कृत्य

Breaking News

धक्कादायक ... "पिल्लू दोन मिनिटं सहन कर, जास्त त्रास होणार नाही", प्रियकराने केले प्रियसीसोबत भयानक कृत्य

धक्कादायक ... "पिल्लू दोन मिनिटं सहन कर, जास्त त्रास होणार नाही", प्रियकराने केले प्रियसीसोबत भयानक कृत्य


प्रियकराने घराजवळ वास्तव्यास असलेल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्याकेली.

 यानंतर स्वतः देखील रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तीन महिन्यापूर्वी घडली होती. पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 नवी मुंबईच्या कळंबोली परिसरातील वैष्णवी बाबर (वय १९) आणि वैभव बुरुंगले (वय २४) यांच्यात मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद होत होते.

 याचवेळी वैभवच्या मनात संशयाने घर केले आणि मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वैभवने वैष्णवीची हत्या करण्याचा कट रचला. वैष्णवीची हत्या करणार, कुठे करणार, कशी करणार या सर्व बाबी वैभवने आधीच सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या.

 त्याप्रमाणे वैभवने वैष्णवीला खारघर हिलवर घेऊन जाऊन गळा आवळून हत्या केली. पिल्लू तुला दोन मिनिट त्रास होईल असे म्हणत त्याने तिचा गळा आवळला. यानंतर स्वतः देखील जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली.

 वैभवच्या आत्महत्येचा तपास करत असताना त्याच्या मोबाईलमध्ये वैष्णवीची हत्या केल्याचे लिहून ठेवले होते. या सोबतच LO1-501 हा सांकेतिक क्रमांक लिहून ठेवला होता. पोलिसांनी खारघर हिल परिसरात सात दिवस शोध मोहीम राबविली

 अखेर तो संकेतीक क्रमांक म्हणजे झाडाचा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाल्यावर ड्रोनच्या सहाय्याने शोधले असता वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा नवी पोलिसांनी तपास करत हत्या आणि आत्महत्येचा उलगडा केला.

Post a Comment

0 Comments