सोलापूर जिल्ह्यातील घटना...पोलीसच अडकला पोलिसांच्या जाळ्यात
सोलापूर (प्रतिनिधी) दाखल गुन्ह्यात जप्त असलेले वाहन सोडण्यासाठी १.५ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ०१ लाख ३० हजार रुपये स्वीकारण्यास संमती
दिल्याप्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र नारायण बाबर याच्याविरुद्ध एसीबी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची
प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी सांगितले. सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत वैराग पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले
पोलीस हवालदार रवींद्र नारायण बाबर (बक्कल नंबर १४१६ ; रा. शिवाजीनगर,बाळे, सोलापूर) यांनी वैराग पोलीस ठाण्यात मध्ये दाखल दारूबंदीच्या गुन्ह्यात एम.एच.13
डी.वाय 25 48 क्रमांकाची कार जप्त केली होती. ते वाहन सोडण्यासाठी पोलीस हवालदार बाबर यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. एक लाख तीस हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली.
याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केल्यावर, ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम
सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलिस अंमलदार पोलीस नाईक नरोटे पोलीस शिपाई मुल्ला व चालक गायकवाड सर्व नेमणूक जेसीबी सोलापूर यांनी पार पाडली.
0 Comments