google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इंतेहाँ अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्टीभर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है! डॉ. अनिकेत देशमुखांनी विरोधकांचा खरपूस समाचार

Breaking News

‘जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इंतेहाँ अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्टीभर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है! डॉ. अनिकेत देशमुखांनी विरोधकांचा खरपूस समाचार

 ‘जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इंतेहाँ अभी बाकी है, अभी तो नापी है


मुट्टीभर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है! डॉ. अनिकेत देशमुखांनी विरोधकांचा खरपूस समाचार

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- सांगोल्यात चार दिवसांचे 'गणेशरत्न कृषी राज्यस्तरीय महोत्सव' आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार होते.

 शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमातील डॉ. अनिकेत देशमुख यांचे भाषण चर्चेचा विषय झाले आहे.

आम्ही दोघं तरुण आहोत. आम्हाला राजकारणात आबासाहेबांची पुण्याई लाभली आहे. बरीच लोकं रामायणातील कैकयीची भूमिका आमच्या दोघांमध्ये करीत आहेत. त्यांना मी एवढंच सांगतो,

 राम आणि भरतामध्ये कधीही मतभेद नव्हते. जेवढा मान राम भरताचा करायचा, तेवढाच मान भरत रामाचा करायचा. पण जे लोकं कैकयीची भूमिका निभावत आहेत, त्यांना आमच्या दोघांच्या वतीने सांगतो, 

‘जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इंतेहाँ अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्टीभर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है! अशी शायरी सादर करून डॉ. अनिकेत देशमुखांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.डॉ. देशमुखांचा रोख कुणाकडे

राम आणि भरतामध्ये कधीही मतभेद नव्हते काहीजण आम्हा दोन भावंडांमध्ये रामायणातील कैकयीप्रमाणे भूमिका निभावत आहेत. 

त्यानं मी एवढंच सांगतो की, राम आणि भरत यांच्यामध्ये कधीही मतभेद नव्हते. राम जेवढा मान भरताचा करायचा, तेवढाच मान भरत हा रामाचा करायचा.

 पण आमच्यामध्ये कोणी भांडण लावण्याचे काम करू नये, असा सल्ला डॉ. अनिकेत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधकांना दिला.

डॉ. देशमुख म्हणाले की, गणपतराव देशमुख यांनी 55 वर्षे शेतकरी, कष्टकरी गोरगरीब वंचित घटकांचे प्रश्न मांडले. नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी मात करून शेतीत प्रगती साधली. एकत्रित पाणी परिषदा घेतल्या.

 सत्ता नसताना काय करता येईल, याचा विचार करून कृषी महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना राबविली. सर्वसामान्य शेतकऱ्यांना अर्थक्रांती करण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 दर दोन-तीन वर्षांनी शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. किसान रेल्वे पुन्हा व्हावी.सध्याचे लोकप्रतिनिधी पाणी आणल्याचा दिंडोरा पिटत आहे. पण, पाण्यासाठी कोणी प्रयत्न केला, 

पाणी कोणी आणले आहे, हे तालुक्याला माहीत असून जनता सुज्ञ आहे. शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेकाप कटिबद्ध आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments