google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज....शिंदे गट हीच खरी 'शिवसेना', 16 आमदार पात्र ठाकरे गटाला धक्का

Breaking News

ब्रेकिंग न्यूज....शिंदे गट हीच खरी 'शिवसेना', 16 आमदार पात्र ठाकरे गटाला धक्का

 ब्रेकिंग न्यूज....शिंदे गट हीच खरी 'शिवसेना', 16 आमदार पात्र ठाकरे गटाला धक्का


राज्याच्या राजकारणात आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय ठरला आहे. राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय. 

शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. 

शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. भरत गोगावलेंचा व्हीप योग्य असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही.

 शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत. शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, 

त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.

Post a Comment

0 Comments