Breaking News

धक्कादायक बातमी.,. पत्नी- मुलीसह मंदिरात पूजा केली, नंतर त्यांनाच पुलावरून नदीत ढकललं

 धक्कादायक बातमी.,. पत्नी- मुलीसह मंदिरात पूजा केली, नंतर त्यांनाच पुलावरून नदीत ढकललं


गुजरातच्या वलसाडमधून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एक इसमाने त्याची पत्नी आणि 11 वर्षांची लेक या दोघींनाही नदीत धक्का दिला.

पाण्याच बुडून त्या दोघींचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. एवढंच नव्हे तर त्या दोघींना नदीत ढकलल्यावर त्या इसमान स्वत:देखील नदीत (जीव देण्यासाठी) उडी मारली. मात्र आजूबाजूच्या लोकांनी पटकन धाव घेऊन त्याला वाचवलं.

 रिपोर्ट्सनुसार, त्या इसमाची पत्नी आणि मुलगी या दोघांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरामुळे एकच खळबळ माजली आहे.

विजय पांडे ( वय 45) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय हाहमरान गावच्या वरोली नदीजवळ असलेल्या एका पुलावरील खांबाजवळ आढळला. इतर लोकांनी त्याचा जीव वाचवला.

 पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्या इसमाच्या पच्नीला फिट्स येत होत्या आणि त्याची मुलगी मानसिक दृष्ट्या आजारी होती. त्याने त्या दोघीनांही नदीत धक्का दिल्याने, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments