सांगोला आगार ५५ एसटी बसमध्ये ऑनलाईन तिकिटाची सुविधा उपक्रमासाठी
सांगोला एसटी आगाराकडील ५५ एसटी बसेसमध्ये १५० तिकीट मशिन्स नव्याने सेवेत दाखल
सांगोला : आता राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांना तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची गरज अथवा चिंता भासणार नाही.
कारण राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, सुट्टे पैशांची अडचण भाऊ नये यासाठी ऑनलाईन तिकीट सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
आता याबाबत सांगोला आगारानेदेखील पुढाकार घेतला असून, एक पाऊल पुढे टाकत 'डिजीटल' प्रणालीद्वारे (ऑनलाईल) तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या उपक्रमासाठी सांगोला एसटी आगाराकडील ५५ एसटी बसेसमध्ये १५० तिकीट मशिन्स नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. अशी माहिती आगार प्रमुख विकास पोफळे यांनी दिली आहे.
आता वाद टळणार
'कॅशलेस इंडिया'च्या धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजीटल पेमेंट व्हावे, व्हावे, यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.
त्यादृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना फोन पे, गुगल पेद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
वाहकाकडील अँड्राईड तिकीट यंत्रावरील क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजीटल स्वरुपात देता येणे शक्य आहे. परिणामी, सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे बाद टळू शकणार आहेत.
या नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजीटल पेमेंटचा वापर करुन तिकीट काढता येणार आहे.
या डिजीटल प्रणालीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख विकास पोफळे यांनी केले आहे. प्रवास करताना अनेकदा सुट्टे पैशांवरुन प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात.
परंतु, आता एसटी महामंडळाने 'डिजीटल' प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एसटीच्या सर्व वाहकांसाठी नवी अँब्रईड तिकीट इश्यू यंत्रे घेतली आहेत.
नव्या यंत्रांमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोखीने व्यवहार टाळून यूपीआय, क्युआर कोडद्वारे 'डिजीटल पेमेंट'चा वापर करुन तिकीट काढता येणार आहे. यूपीआय पेमेंटद्वारे क्युआर कोडच्या माध्यमातून
एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकीट विक्री सुरु झाली आहे. डिजीटल तिकीट प्रणालीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांगोला एसटी महामंडळाकडून करण्यात आले.
0 Comments