खळबळजनक ... सांगोला येथील दुय्यम निबंधक यांची फसवणूक केल्याचा प्रकार मूळ मालक मयत असतानाही जमिनीची विक्री चौघांवर गुन्हा : बनावट दस्त तयार केला
सांगोला : मूळ जमीनमालक मयत असूनही चौघांनी मिळून तोतया व्यक्ती उभी करून निवेदन व ओळखपत्र तयार करून शेतजमिनीच्या बनावट
दस्ताच्या आधारे मयताच्या नावे असलेली ९१ आर शेतजमीन ४ लाख २५ हजारांस परस्पर विक्री करून
सांगोला येथील दुय्यम निबंधक यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत दुय्यम निबंधक शिवाजी भीमराव चव्हाण (रा. सांगोला) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी समाधान सुखदेव माने, रामेश्वर सयाप्पा माने (दोघेही रा. तपकिरी शेटफळ, ता. पंढरपूर), समाधान तुकाराम दुधाळ (रा. सावे, ता. सांगोला) आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एखतपूर येथील मृत बाबूराव भोजू भोसले यांची एखतपूर हद्दीत ९१ आर शेत जमीन आहे.
बाबूराव' भोसले हे २३ मार्च२००० साली मयत झाले असतानाही चौघांनी ५ जुलै २०२३ रोजी तोतया व्यक्ती उभी करून खोटे कागदपत्रे तयार करून लिहून देणारा
मृत बाबूराव भोसले हा स्वतः असल्याचे दुय्यम निबंधक यांना भासवून वर नमूद जमीन ही यातील लिहून घेणार समाधान सुखदेव माने यांना ४ लाख २५ हजार रुपयांना विक्री केली व पैसे मिळाल्याचे सांगितले.
दरम्यान, शहाजी विठ्ठल भोसले यांच्या २६ ऑक्टोबर रोजीच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने दुय्यम निबंधक यांनी ग्रामपंचायत कार्यालय, एखतपूर, ता. सांगोला यांच्याकडे पत्रव्यवहार केला.
त्यांच्याकडून बाबूराव भोजू भोसले यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने वरील चौघांनी मिळून त्याच्या परस्पर शेतजमीन बनावट कागदपत्राच्या आधारे
विक्री करून फसवणूक केल्याचा तक्रारी अर्जावरून प्रकार उघडकीस आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments