google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला बसस्थानकामध्ये मंगळसूत्राची चोरी - तीन तासांच्या कालावधीत दोन घटना

Breaking News

मोठी बातमी...सांगोला बसस्थानकामध्ये मंगळसूत्राची चोरी - तीन तासांच्या कालावधीत दोन घटना

मोठी बातमी...सांगोला बसस्थानकामध्ये मंगळसूत्राची चोरी -


तीन तासांच्या कालावधीत दोन घटना

सांगोला :  जवळच पोलिस चौकी, एस.टी.चे कर्मचारी तसेच चालक- वाहक आणि तोबा गर्दी असताना बसस्थानक परिसरामध्ये दोन

 महिलांचे मंगळसूत्र चोरुन नेल्याची घटना शनिवारी (दि. २३) घडली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन

 शालेय विद्यार्थिनींचे मोबाईल चोरी करुन चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. मंगळसूत्र चोरीप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.

बसस्थानकाच्या गेटवरच पोलिस चौकी आहे; परंतु पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी उपस्थित नसतात.बसस्थानक आवारामध्ये पोलिसांकडून वेळोवेळी गस्त घातली जात नाही, 

अशी माहिती बसस्थानक परिसरातून मिळत असताना सांगोला एस.टी. प्रशासनानेदेखील यात्रा-सण-उत्सव काळात एस.टी. बसस्थानकात पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी वेळोवेळी केली.

सांगोला-आटपाडी एस.टी. बस सुटण्याच्या वेळेस दोन महिलांचे मंगळसूत्र चोरीस गेले. हा चोरीचा प्रकार घडल्यानंतर एस.टी. बस सांगोला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आली. 

यावेळी बसची पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये मंगळसूत्र चोर आढळून आले नाहीत. याबाबत पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.

Post a Comment

0 Comments