कै. रामदास भोसले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
सांगोला :- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष कै. रामदास भोसले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार
दिनांक 15 डिसेंबर रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
कै. रामदास भोसले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पंचक्रोशीतील भजनी मंडळी यांच्या वतीने भजन कार्यक्रम सकाळी 9 ते सकाळी 10 . 30 पर्यंत संपन्न होणार आहे.
तसेच ह. भ. प. राहुल डुंबरे महाराज नाशिककर यांचा सकाळी 10.30 ते दुपारी 12 वा. पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यांचेयासह दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी आजूबाजू परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मण सदाशिव भोसले,
माणिक सदाशिव भोसले, डॉ. शिवराज रामदास, भोसले संजय रामदास भोसले व भोसले परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments