google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...घरातील पैसे का खर्च केले म्हणून पत्नीचा खून

Breaking News

खळबळजनक घटना...घरातील पैसे का खर्च केले म्हणून पत्नीचा खून

खळबळजनक घटना...

घरातील पैसे का खर्च केले म्हणून पत्नीचा खून


परस्पर बचत गटाचे पैसे का उचलले व घरातील पैसे का खर्च केले या कारणावरून पतीने मित्राच्या मदतीने कोठेतरी पत्नीचा गळा दाबून मारहाण करुन जीवे ठार मारले व मृतदेहाची विल्हेवाट 

लावण्यासाठी पिंपळनेर ता.माढा येथील डोणवाडी कॅनोलमध्ये मृतदेह फेकून दिला. ही घटना दि.२६ रोजी उघडकीस आली. संगीता नवनाथ डमरे वय ३६ रा.आगळगाव ता.बार्शी असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. 

याबाबत मयताचा भाऊ विजय विठ्ठल गायकवाड वय ३१, रा. कुळसंब ता. बार्शी यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती

 अशी की फिर्यादीची बहिण मयत संगीता नवनाथ डमरे रा .आगळगाव ता. बार्शी हीने बचत गटाचे पैसे परस्पर उचलले आणि घरातील पैसे खर्च केले या कारणावरून फिर्यादीचा दाजी म्हणजे मयत संगीताचा पती 

नवनाथ ज्ञानोबा डमरे याने त्याचा मित्र धनु उकरंडे यांच्या मदतीने फिर्यादीच्या बहिणीस कोठेतरी गळा दाबून मारहाण करून जीवेठार मारून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत पिंपळनेर ता.माढा येथील कॅनलमध्ये फेकून दिले. 
याबाबत मयताचा भाऊ विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून नवनाथ ज्ञानोबा डमरे व धनाजी वैजनाथ उकिरडे दोघे रा.आगळगाव ता.बार्शी. या दोघा संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments