google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयंकर घटना ..! बसमधील तेरा प्रवासी जिवंत जळाले !

Breaking News

भयंकर घटना ..! बसमधील तेरा प्रवासी जिवंत जळाले !

 भयंकर घटना ..! बसमधील तेरा प्रवासी जिवंत जळाले !


राज्यात आणि देशातून सतत अपघाताच्या घटना घडत असतानाच, एका बसला आग लागल्याने तब्बल तेरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची मोठी आणि धक्कादायक घटना रात्री घडली आहे.

देशभरात आणि राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे, रुंद आणि सिमेंटचे रस्ते सगळीकडेच झाल्याने, वाहनांचा वेग वाढलेला आहे. अमर्याद आणि जीवघेणा वेग असल्यामुळे अपघाताचे आकडेही वेगाने वाढताना दिसत आहेत. 

दररोज अपघाताच्या बातम्या समोर येत असून, यात राज्य परिवहन महामंडळाच्या बस अपघातांचाही समावेश आहे. जुन्या झालेल्या बस वापरात असल्यामुळेच अनेक बस अपघात होत आहेत परंतु मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात झालेला हा अपघात अत्यंत धक्कादायक ठरला आहे. 

प्रवासी बसला आग लागल्यामुळे तब्बल तेरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर सतरा प्रवासी जखमी झाले आहेत. अशा घटना वाढत असल्यामुळे प्रवास देखील किती धोक्याचा झाला आहे

 याची प्रचीती येवू लागली आहे. यापूर्वी देखील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी झालेली नव्हती. या घटनेने मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

गुना - आरोन रस्त्यावर रात्री हा अपघात झाला असून एका ट्रकला प्रवासी बस जोराने धडकली आणि ही धडक झाल्यानंतर बसला आग लागली. रात्रीची वेळ असल्याने बस  मधील प्रवासी अर्धवट झोपेत होते. 

त्यामुळे सुरुवातीला काहीच कळले नाही परंतु प्रवाशात मात्र एकच गोंधळ उडाला. एकीकडे अपघात आणि त्यानंतर बसला लागलेली भीषण आग, यामुळे प्रवाशात आरडा ओरडा आणि आक्रोश सुरु झाला. 

विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन त्यात आग लागली. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव वाचवणे देखील कठीण होऊन बसले.  

या आगीत 13 जणांचा होरपळून झाला आहे. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

आग लागलेल्या प्रवासी बसमधून एकूण ३० प्रवासी प्रवास करीत होते त्यातील सगळेच्या सगळे प्रवासी या अपघाताने आणि आगीने प्रभावित झाले. १३ जणांचा तर होरपळून मृत्यू झाला आणि १७ प्रवाशी भाजले गेले, 

शिवाय बस पलटी झाल्याने अनेकांना मार देखील  लागला आहे. हा अपघात होताच बस मधील चार प्रवासी मात्र बाहेर पाडण्यात यशस्वी झाले. बाकीच्या प्रवाशांना मात्र बसच्या बाहेर पाडण्यात यश आले नाही.  

हे सगळे काही क्षणात घडून गेले आणि प्रवाशांना आपला जीव वाचवता आला नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासन तातडीने घटनास्थळी धावले 

आणि शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आधीच तेरा प्रवाशांचा बळी गेलेला होता. प्रचंड प्रमाणात आग लागल्याने हा मोठा अनर्थ घडला होता. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, 

या बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

बसमधून प्रवास करीत असलेल्या तेरा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेने मध्य प्रदेश हादरून गेला असून, अशा घटना पुन्हा होऊ नयेत 

यासाठी प्रशासनाने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी होऊ लागली आहे. प्रवासी जिवंत जाळले गेले याचा अनेकांना धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments