तहसीलदार सांगोला यांनी महूद गावच्या जडवाहतुकीची केली पाहणी....
महूद (ता.सांगोला) या गावातून राजरोसपणे चालू असणारी जडवाहतूक बंद करण्यासंदर्भात पत्रकार पवन बाजारे व ग्रामस्थ यांची
अनेक दिवसाची मागणी असल्यामुळे यासंदर्भात,, दि.28 डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता सांगोल्याचे तहसीलदार कणसेसाहेब यांनी महूद गावातील
मेन चौकामध्ये येऊन जडवाहतुकीची पाहणी केली यावेळी महूद गावचे ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप नागणे, कैलास खबाले, अरुण नागणे, नवा सरतापे,
अशोक येडगे, लिंगराज येडगे, आप्पा बाबर, पत्रकार पवन बाजारे तसेच इतर सर्व ग्रामस्थ यांनी प्रामुख्याने मेन चौकातील जडवाहतुकीबद्दल व वाहतूककोंडी तसेच यापूर्वी झालेल्या
अपघातासंबंधी सविस्तर तक्रार तहसीलदार साहेब यांच्याकडे करून यावरती ताबडतोब ही मोठी जडवाहतूक बंद करण्याचा निर्णय झालाच पाहिजे असे ठामपणे सांगितले व मागणी केली.
तसेच यावेळी संबंधित महूद ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिंदे यांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य बॉडीचा जडवाहतूक बंद करण्यासंदर्भाचा केलेला ग्रामपंचायत ठराव निवेदन तहसीलदार साहेब यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
तरी यासंदर्भात तहसीलदार यांनी लवकरच याबाबतीत जडवाहतुक बंद करण्यासंदर्भात संबंधित विभागाला पाठपुरावा करून पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी महूद गावातील सर्व पक्षाचे राजकीय, सामाजिक, कार्यकर्ते तसेच हॉटेल व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments