google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना.... तू दिसायला चांगली नाहीस, कामधंदा येत नाही; विवाहितेचा सतत छळ, सासरच्यांकडून संतापजनक कृत्य

Breaking News

खळबळजनक घटना.... तू दिसायला चांगली नाहीस, कामधंदा येत नाही; विवाहितेचा सतत छळ, सासरच्यांकडून संतापजनक कृत्य

खळबळजनक घटना.... तू दिसायला चांगली नाहीस, कामधंदा येत नाही;


विवाहितेचा सतत छळ, सासरच्यांकडून संतापजनक कृत्य

”कामधंदा येत नाही, तू दिसायला चांगली नाहीस, चांगले वागत नाहीस, यासह माहेराहून फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये”, 

अशी मागणी करून छळ होत असल्याची तक्रार विवाहितेने भरोसा सेलकडे केलेली केली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

महवीश तबस्सुम अरशद शेख (रा. भीमनगर परभणी (ह.मु. सेलू) यांनी भरोसा सेलकडे तक्रार केली की, १० एप्रिल २०१७ ते २८ जुलै २०२३ या कालावधीत सासरी अर्शद शाहमद शेख (पती), हलिमा शाहमद शेख, शाहमद

 रहीम शेख, ईशाद शाहमद शेख, सलमा आबेद शेख, आबेद बिस्मिला शेख, हनिफा रहीम शेख यांनी संगनमत करून फिर्यादीस ”तुला कामधंदा येत नाही, तुला स्वयंपाक येत नाही, 

तू दिसायला चांगली नाहीस, तू सासरच्या लोकांसोबत चांगले वागत नाहीस”, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच उपाशीपोटी ठेवून, शिवीगाळ करून त्रास दिला.

 पतीने तू माहेराहून फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलून दिले.

या प्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कांबळे यांच्या आदेशाने साता आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस जमादार शेख उस्मान तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments