धक्कादायक ...घरासमोरच कपडे काढून महिलेचा विनयभंग,कोंढवा
परिसरतील प्रकार…पुण्यात नेमकं चाललंय काय ?
अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे.
हा प्रकार मंगळवारी (दि.26) सायंकाळी पाच ते सव्वापाच आणि यापूर्वी वेळोवेळी एनआयबीएम रोडवरील एका बिल्डिंगच्या समोरील मोकळ्या जागेत घडला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने मंगळवारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन सिद्धांत विजय जाधव (रा.शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 354 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एनआयबीएम रोड वरील एका बिल्डिंगमध्ये राहते.
आरोपी जाधव मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिलेच्या फ्लॅटच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत आला.
त्याने अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले.
आरोपीने यापूर्वी देखील अशा प्रकारे गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहेत.
0 Comments