google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदार निलंबित आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन!

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९ खासदार निलंबित आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन!

 ब्रेकिंग न्यूज...सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह ४९


खासदार निलंबित आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन!

नवी दिल्ली : लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच्या निलंबनावरून विरोधकांकडून सत्ताधा-यांना घेरले होते. अशातच 

आजही आणखी ४९ खासदारांचे निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आले आहे. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट खासदार 

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांतून आतापर्यंत १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज विरोधकांनी सत्ताधा-यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावरून घेरले. 

संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणा-या अनेक खासदारांना 

आज पुन्हा निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.

आज ४१ खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे.

 यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहांतील १४१ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. १८ डिसेंबरपर्यंत एकूण ९२ खासदारांचे निलंबन करण्यात आले होते.

आज कोणत्या खासदारांचे निलंबन

सुप्रिया सुळे

अमोल कोल्हे

मनीष तिवारी

शशी थरूर

मोहम्मद फैसल

कार्ती चिदंबरम

सुदीप बंदोपाध्याय

डिंपल यादव

दानिश अली

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की,

 ‘लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडून आलोय. पण दडपशाही सुरू झाली. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त खासदार निलंबित झाले आहेत, संसदेत हल्ला झाला, त्यासंदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली. 

पण प्रश्न विचारणारे बाहेर आहेत. सत्ताधा-यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली. आमचे सरकार होते, त्यावेळी आम्ही कधीच असे केले नाही.

 देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन द्यावे, त्यावर चर्चा व्हायला हवी आहे. पण सरकारला चर्चा करायची नाही, दडपशाही सुरू आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

तसेच, लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा असून लोकशाहीचा आवाज दाबण्याचे पाप आज दिल्लीमध्ये होतंय. विरोधी पक्षाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments