कडलास नाका ते सांगोला महाविद्यालय रोड मृत्यूला आमंत्रण स्पीड ब्रेकर खूप गरजेचे... डॉ परेश खंडागळे
कडलास नाका ते सांगोला महाविद्यालय पर्यंत वाहनांचे स्पीड खूप असते त्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिकवाढले आहे.
या रोड ला स्पीड ब्रेकर खूप गरजेचे आहेत.या रोड ला बरेच हॉस्पिटल आहेत त्यामुळे लोकांची ये जा मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच मोठ्या वाहनांची वर्दळ पण खूप आहे.
रोड चांगला असल्यामुळे वाहनांची गती पण खूप असते . आत्ता पर्यंत या गोष्टीमुळे बऱ्याच लोकांना अपघातांचा सामना करावा लागला आहे त्यामध्ये अनेकांचे जीवन संपले, फ्रेंक्चर झाले,
डोक्याला मार लागला आहे.त्यामुळे प्रशासन व सरकार मधील सर्व अधिकारी, नेते मंडळी यांना विनंती आहे लवकरात लवकर या रोड ला स्पीड ब्रेकर करावे वट्रॅफिक नियम पाळण्यासाठी काही तरी पर्याय व्यवस्था करावी.
आपलाच,
डॉ परेश खंडागळे सांगोला.


0 Comments