कटफळ ता सांगोला जिल्हा परिषद शाळेस वॉटर फिल्टर चे लोकार्पण व हस्तांतरण सोहळा संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कटफळ ता सांगोला जिल्हा सोलापूर येथे जना स्मॉल फायनान्स व( कै अप्पासाहेब माने यांच्या स्मरणार्थ श्री ऋषिकेश माने यांचे) मार्फत CSR अंतर्गत( सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत )
वॉटर प्युरिफायर लोकार्पण व हस्तांतरण सोहळा संपन्न .आज दिनांक 16 डिसेंबर 2023 जिल्हा परिषद केंद्र शाळेत जना बँकेचे रिजनल मॅनेजर माननीय मौला अली साहेब
,गजानन साहेब जना बॅंक कटफळ चे मॅनेजर मा. प्रभाकर वाघमारे साहेब ,विजय धांडोरे साहेब , कटफळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. शहाजी खरात त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते व पोलिस मा. दत्तात्रय खरात साहेब,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. कृष्णदेव लेंगरे, मा बिरुदेव हांडे, मा.सचिन खरात,इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते . सदर कार्यक्रम प्रसंगी वॉटर प्युरिफायर चे उद्घाटन करून लोकार्पण व हस्तांतरण करण्यात आले .
यावेळी मान्यवरांकडून सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली सदर कार्यक्रम प्रसंगी प्रदीप चव्हाण मुख्याध्यापक यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मौला अली साहेब,पोलिस श्री दत्तात्रय खरात यांनी मनोगत व्यक्त केले .
गावाच्या प्रगतीसाठी जना बँकेने व नागरिकांनी सहकार्य करण्याचे श्री खरात साहेबांनी अहवान केले .त्याचबरोबर या कामाचे टाकीचे व प्लंबिंगचे सहकार्य मा ऋषिकेश माने साहेब यांनी केले आहे.
केंद्रीय मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. नम्रता गायकवाड मॅडम यांनी जना स्मॉल फायनन्स बॅक व श्री ऋषीकेश माने साहेबांचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्व विध्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*


0 Comments