अकोला सांगोला येथील घडलेल्या लैंगिक अपराधाविषयी पॉस्को अंतर्गत आरोपीस जामीन मंजूर
सांगोला /शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क : वासुद - अकोला सांगोला येथील घडलेल्या घटनेविषयी राजेंद्र जाधव याच्यावर लैंगिक अपराधाविषयी भादवि कलम ३७६, ३७६ (२)i,
पॉक्सो कायदा कलम ४,६,८,१२, बालविवाह विरोधी कायदा कलम ९ प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले होते . सदरचा आरोपी जेलमध्ये होता. एडवोकेट सागर बनसोडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून
मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. तोष्णीवाल साहेब पंढरपूर यांनी सदर आरोपीस जामीन मंजूर केला. सदरच्या केस मध्ये ऍड. सागर बनसोडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला जामीन मिळाला.
आरोपीच्या वतीने एडवोकेट सागर बनसोडे एडवोकेट महादेव कांबळे एडवोकेट काकासो केंगार मूळ फिर्यादीतर्फे एडवोकेट आर. जी. हजारे व सरकार तर्फे एडवोकेट वांगीकर यांनी काम पाहिले.


0 Comments