google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील मार्केट कमिटी परिसरात पशुपालकांना, व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अस्वच्छतेचा नाहक त्रास..ना स्वच्छ पाणी, ना पुरेशी शौचालये

Breaking News

सांगोला तालुक्यातील मार्केट कमिटी परिसरात पशुपालकांना, व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अस्वच्छतेचा नाहक त्रास..ना स्वच्छ पाणी, ना पुरेशी शौचालये

 सांगोला तालुक्यातील मार्केट कमिटी परिसरात पशुपालकांना,


व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अस्वच्छतेचा नाहक त्रास..ना स्वच्छ पाणी, ना पुरेशी शौचालये 

जनावरांच्या आठवडा बाजारात सुविधांचा अभाव ना चेअरमनचे ना सचिवाचे लक्ष, व्यापारी, पशुपालकांना सहन करावा लागतोय अस्वच्छतेचा त्रास

सांगोला:-  संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेला सांगोला येथील जनावरांच्या बाजारात सध्या मूलभूत आणि प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. पशुपालकांना, व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार खिलार गाई, शेळ्या, मेंढ्या, आणि म्हशींच्या बाजारासाठी राज्यात प्रसिध्द आहे. राज्यातून अनेक पशुपालक आणि व्यापारी जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी येतात.

 ते आल्यानंतर मार्केट कमिटी परिसरात त्यांना पुरेशा सोयी सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक पशुपालक, व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. सांगोला येथील आठवडा बाजार रविवारी भरतो.राज्यात प्रसिध्द असलेल्या जनावरांच्या बाजारात पुरेशी शौचालये नाहीत, 

जी आहेत ती कधी बंद अवस्थेत तर कधी अस्वच्छतेने ग्रासलेली असतात. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, खिलार जनावरानापाण्याचे हौद भरून ठेवले जातात.

 पण ते पाणी अतिशय अस्वच्छ असते. त्यामुळे पशुपालकांना विकतचे पाणी घेवून जनावरांना द्यावे लागत आहे. शौचालयाच्या अपुऱ्या सोयीमुळे व्यापाऱ्यांना आणि

या अपुऱ्या सोयी सुविधा बाबत मार्केट कमिटीचे चेअरमन समाधान पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद लागला.

पशुपालकांना उघड्यावरच

प्रातः विधी उरकावा लागत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पण या अपुऱ्या सोयी सुविधा कडे मार्केट कमिटीचे चेअरमन

 आणि सर्व संचालकाचे तसेच सचिव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक पशुपालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

 मार्केट कमिटीच्या तीन प्रवेशद्वारावर कमिटीचे कर्मचारी खरेदी विक्रीच्या एंट्रीच्या पावत्या फाडत असतात. पण प्राथमिक सोयी सुविधा देण्यास मात्र असमर्थ असल्याचे अनेकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments