google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालय, सांगोला येथे उदघाटन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Breaking News

सांगोला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालय, सांगोला येथे उदघाटन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 सांगोला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालय, सांगोला येथे उदघाटन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न



सांगोला (प्रतिनिधी):- पंचायत समिती (शिक्षण विभाग) सांगोला तालुका व मातोश्री गिरीजाबाई ढोबळे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक विद्यालय 


सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे उदघाटन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक ८/ १२ / २०१३ रोजी संपन्न झाला.

या प्रदर्शनाचे उदघाटन माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

 यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे व गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते आठवी गटातमातोश्री गिरीजाबाई ढोबळे प्राथमिक विद्यालयाचा मोहम्मद शाज खतीब (प्रथम क्रमांक), महात्मा फुले विद्यालय

 डोंगरगावची वैष्णवी राजगे (द्वितीय क्रमांक), तर श्रीधर कन्या प्रशाला, नाझरे या विद्यालयाच्या मयुरेश बाबर यांनी (तृतीय क्रमांक) मिळवला.

इयत्ता नववी ते बारावी या गटात सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा कुशल खाडे प्रथम क्रमांक, न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मधील आदिती शिंदे द्वितीय क्रमांक, उत्कर्ष विद्यालय

 सांगोला ची श्रेया मोरे तृतीय क्रमांक, प्राथमिक शिक्षक गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाडगे मळा हातीद येथील वैशाली भोसले (प्रथमक्रमांक), 

शाळा झापाचीवाडी - उदनवाडी येथील सिद्धनाथ मिसाळ ( द्वितीय क्रमांक), तर मातोश्री गिरीजाबाई ढोबळे प्राथमिक विद्यालय सांगोला येथील वैशाली शिंदे (तृतीय क्रमांक), माध्यमिक शिक्षक गटामध्ये विकास अजनाळे चे सुहास गुरव (प्रथम क्रमांक )

 नाझरे विद्या मंदिर प्रशालेचे सोमनाथ सपाटे (द्वितीय क्रमांक) विकास विद्यालय अजनाळे कृष्णा देशमुख (तृतीय क्रमांक) यांनी यश मिळवले आहेयावेळी परीक्षण प्रा.श्री. शिंदे आर.ए (विभागप्रमुख रसायनशास्त्र सांगोला कॉलेज), 

श्री. बावचे एस.डी. (टी.पी.ओ. शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला) श्री. पवार पी.जी (इन्चार्ज जनरल सायन्स अँड सिटी हयुम्यानिटी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला) यांनी केले.

यावेळी डी. एल एड चे प्राचार्य व स्थानिक संस्थापक सर्फराज खतीब, बी.एड चे प्राचार्य साधू गरांडे, वायसीएम केंद्रसमन्वयक सचिन सुरवसे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दिगंबर कानगुडे, प्राथमिक विभाग प्रमुख वैशाली शिंदे उपस्थित होती.

 सूत्रसंचालन बी.एड विभाग प्रमुख प्रा. शितल गयाळी व डी.एल.एड विभाग प्रमुख स्वाती पाटोळे यांनी केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

मातोश्री गिरीजीबाई ढोबळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी मोहम्मद शाज सर्फराज खतीब इयत्ता सहावी याने सहावी ते आठवी या गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला 

त्याला यासाठी मुख्याध्यापक दिगंबर कानगुडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, वर्गशिक्षिका स्वाती कळमनकर व विज्ञान शिक्षिका सुप्रिया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments