google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शासकीय कार्यालयांत सावळा गोंधळ कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण वाटाघाटी: राजकीय नेतेमंडळींचे दर्लक्ष; जनता हतबल

Breaking News

सांगोला शासकीय कार्यालयांत सावळा गोंधळ कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण वाटाघाटी: राजकीय नेतेमंडळींचे दर्लक्ष; जनता हतबल

 सांगोला शासकीय कार्यालयांत सावळा गोंधळ कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण वाटाघाटी:


राजकीय नेतेमंडळींचे दर्लक्ष; जनता हतबल

सांगोला :( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)

सांगोला शहरासह तालुक्यात अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांची लूट सुरू असून अधिकारी अर्थपूर्ण वाटाघाटी करीत आहेत. सर्वसामान्याला न्याय मिळत नाही. असे असताना तालुक्याचे 

आ. शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख हेही मूग गिळून का गप्प आहेत, याबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सांगोला शहर व तालुक्यात अधिकारी अर्थपूर्ण वाटाघाटी करून सांगोल्यात नियुक्ती करून पदभार घेत आहेत. 

नोकरी करत असताना बदली करून आणताना लाखो रुपये देऊन सांगोल्यात येतात. त्यामुळे सांगोल्यातील अधिकारी नागरिकांचीदिवसाढवळ्या लूट करीत आहेत. 

सांगोला शहरातील व तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अधिकारी अर्थपूर्ण वाटाघाटी करीत आहेत. सर्वसामान्यांची वेगवेगळ्या पद्धतीने लूट होत आहे.

महसूल विभागात विविध कामांसाठी अर्थपूर्ण वाटाघाटी होत आहेत. वन विभागातही अनेक कामे बेकायदेशीर होत आहेत. लघुपाटबंधारे विभाग तसेच अन्न व औषध विभागातील अधिकारी दिसत नाहीत. 

सार्वजनिक वन विभाग अधिकारी कामावरच नसतात, तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागात टक्केवारी

 घेतल्याशिवाय कुणालाही काम दिले जात नाही. पंचायत समितीत गटविकास अधिकारी दररोज एक तास हजेरी लावून जातात. त्याबाबत कोणीही आवाज उठवत नाही. 

पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांची अनेक पदे रिक्त असताना हे नेते मूग गिळून का गप्प आहेत?

उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात लाखो रुपयांची मागणी करीत आहेत. अनेकांची प्रकरणे उलटसुलट केली जात आहेत.

 त्यामुळे अनेक तक्रारी वाढल्या असतानासुद्धा हे नेते गप्प का? या अधिकाऱ्यांवरकोणाचा वरदहस्त आहे, याचा सर्वसामान्य नागरिकांना उलगडा करावा. 

कोटेशनसाठी पैशाची मागणी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत आलेले अधिकारी कोणाचेही खांब कोणाच्याही रानात उभे करुन पैशाची मागणी करीत आहे. ज्या मतदारांनी तालुक्यात मतदान केले,

 त्या मतदाराला अजिबात न्याय मिळत नाही. सांगोला शहर व तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होतोय.सर्वसामान्यांची लूट होते. सर्वसामान्यांना तक्रारी करुनही न्याय मिळत नाही.

 ज्यांच्याकडे पैसा त्यांनाच न्याय मिळतो, ही वाईट अवस्था सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.

भाजपचे नेते सर्वसामान्यांच्या अडीअडचणी कधी समजावून घेत नाहीत व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत नाही. भाजपची सत्ता राज्यात व देशात असताना भाजपचे नेते तर मूगगिळूनच गप्प आहेत, 

तर पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर कधीही आवाज उठविल्याचे दिसून येत नाही.

 माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी कुठे निधी दिला आणि कोणाला दिला ते भाजपच्या तालुक्यातील नेतेमंडळींना माहिती आहे. त्यांनाच निधी दिल्याची चर्चा आहे.

चौकट

 शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांवर कोणत्याच नेत्याचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचारी सैरभैर झाले आहेत. 

सर्वसामान्य जनतेची कामे आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय होत नाहीत. अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून कामासाठी विलंब केला जातो. यामुळे जनता वैतागली आहे.

- बाळासाहेब वाळके

सचिव, शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments