google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक बातमी.... जगण्यासाठी पैसेच नसल्याने आई हतबल कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या

Breaking News

धक्कादायक बातमी.... जगण्यासाठी पैसेच नसल्याने आई हतबल कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या

 धक्कादायक बातमी.... जगण्यासाठी पैसेच नसल्याने आई हतबल कोकण


रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या 

सध्या देशात महागाई खूपच वाढत आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 

कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आहे. 

काल सकाळी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली

 आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्या महिलेने तिच्या मैत्रिणीला व्हॉट्स ऍपवर व्हॉइस मेसेज पाठवला होता. वहिनी मला माफ करा,

 मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही, मी दोन मुलींना घेऊन रेल्वे खाली आत्महत्या करायला जात आहे मोहनमुळे, असा मेसेज करून या महिलेने दोन मुलींसह आत्महत्या केली. मोहनला इकडे येऊन रुम सोडायला सांगा

 आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला होता, या मेसेजची माहिती रिना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीने तत्काळ गोरेगाव पोलीस स्टेशन गाठले आणि रिना यांनी,

 त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला. गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रिना जयमोहन नायर या महिलेने जिया आणि लक्ष्मी या चौदा आणि अकरा वर्षांच्या मुलींसह

 कोकणकन्या एक्स्प्रेसखाली आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. रीना यांचे यापूर्वी एक लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा दोन मुली यांना होत्या. 

मात्र, रिना या आर्थिक संकटात त्या सापडल्या होत्या. मुलींचे शिक्षण, खोलीचे भाडे या सगळ्यामुळे रिना खूप हतबल झाल्या होत्या, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. अशा परिस्थितीत रिना यांच्यावर मोठे कर्जही होती.

 पती कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. यामुळे आता जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments