सांगोल्याच्या विकासाचा कोहिनूर : आ. शहाजीबापू पाटील
'काय झाडी, काय डोंगार..' या एका वाक्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध झालेले सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले
आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर म्हणजे २ हजार कोटीचा निधी खेचून आणण्यातही यशस्वी झाले आहेत.
एखाद्या विभागात निधी कसा व किती मिळवला जातो हेच यावेळेच्या आमदारकीच्या काळात शहाजी बापूंनी करून दाखवलं आहे.
राजकारणातील सांगोला म्हटलं की आजपर्यंत विक्रमी वेळा आमदार झालेले स्व, गणपतराव देशमुख यांचेच नाव डोळ्यासमोर येते. परंतु त्यांच्या विरोधात १९९५ चा अपवाद वगळता सतत हार होत
असतानाही लदत राहिलेले शहाजी बापू क्वचितच लक्षात येत होते. एवढ्यावेळा सामना करूनही सत्ताधाऱ्यांना झुंज देत
आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत झगडत शहाजीबापूंनी यावेळची सांगोला विधानसभा जिंकली. गुवाहाटीमधील आपल्या एका डायलॉगमुळे
सर्वत्र प्रसिद्धीही मिळविली. फक्त प्रसिद्धीच्या जोरावर ते थांबले नाहीत तर यावेळी आपण काहीतरी करूनच दाखवायचं व तालुक्याचे नाव कमवायचे असे ठरवलेल्या
बापूंनी आपल्या मतदारसंघात जवळजवळ दोन हजार कोटींच्यावर विविध विकासकामांना निधी खेचून आणला आहे.
अजूनही निधीचा पाऊस तालुका विधानसभा मतदारसंघात पडतच असल्याचे चित्र दिसत आहे.
यापुढील निवडणूकांमध्ये पाण्याचा मुद्दा ठेवणार नाही सांगोला तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो यामध्ये
प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा हा पाणी प्रश्नच असतो, निरा उजवा कालवा, टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजना, उजनीची उचल पाणी,
८१ गावची शिरभावी पाणीपुरवठा योजना इत्यादी शेतीच्या व पिण्याच्या पाणी प्रश्नाभोवतीच निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात.
परंतु आमदार शहाजी बापूंनी सर्वाधिक लक्ष पाण्याच्या योजनांच्या निधीसाठी दिले आहे. शिरभावों व ८१ प्रादेशिक पाणी पुरवठ्यासाठी जवळपास ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
गावांमधील पाणी योजनेच्या पाणीपुरवठ्यासाठी २०० कोटी रुपये तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे उजनीच्या उचल दोन टीएमसी पाणी
मतदार संघात घेण्यासाठी सुमारे ९०० कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे. आपल्या काळात प्रमुख पाणी योजनांसाठी निधी मोठ्या प्रमाणात आणल्यामुळे यापुढील
निवडणुकांमध्ये पाणी हा मुद्दा मी ठेवणारच नसल्याचे छातीठोकपणे आमदार शहाजी बापू पाटील आपल्या भाषणांमधून सांगत आहेत.
काय तो डायलॉग, काय ती प्रसिद्धी
स्व. गणपतराव देशमुख यांच्याविरुद्ध विधानसभेत पराजय झाल्यानंतर शहाजी बापू मतदारांच्या संपर्कात कमी येत होते.
परंतु यावेळीची विधानसभा त्यांनी लढवली व जिंकली. राज्यातील झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमध्ये
ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले, गुवाहटीमधील त्यांच्या "काय ती झाडी, काय ते डॉगार.. एकदम ओके"
या एका डायलॉगमुळे ते संपूर्ण राज्यासह देशभर प्रसिद्ध झाले. अगोदरपासूनच कामाचा सपाटा लावलेले आमदार शहाजी बापूंनी प्रसिद्धी मिळाल्यावर
त्यांना राज्यभर विविध कार्यक्रमांना आमंत्रित केले जाऊ लागले. चित्रपटातील सेलिब्रिटींप्रमाणे हा अनुभव आला.
अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांचा निधीच्या पाठपुरावाकडे मात्र कधीही दुर्लक्षित केल्याचे दिसून आले नाही.
मुख्यमंत्र्यांच्या जवळीकतेचा मतदार संघातील निधीसाठी करून घेतला फायदा
यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून
आमदार शहाजी बापू पाटील निवडून आले होते. जिल्ह्यातील एकमेव आमदार असल्यामुळे व प्रथमपासूनच
राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री राहिल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल्याकडे विविध कामांसाठी त्यासाठी लागणारे निधीसाठी सढळ हाताने मदत होत गेली,
राज्याच्या नव्या समीकरणांमध्ये आमदार शहाजी बापू मुख्यमंत्री एकनाथ शिंद गटात सामील झाल्याने
मुख्यमंत्री जवळीकतेमुळे तालुक्यामध्ये स्वगर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे ९०० कोटी,
शिरभावी व ८१ गावचे पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ४०० कोटी, गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला शहरातील भुयारी गटार योजनाच्या कामांसाठीही १४५ कोटी निधी मिळवला.
त्यांच्या प्रसिद्धीच्या व मुख्यमंत्रीच्या जवळकतेचा फायदा सांगोला
मतदारसंघाला निश्चित प्रकारे झाला आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कामांसाठी मंजूर असलेला निधी
• सुधारित शिरभावी व ८९ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास ४०० कोटी रुपये निधी मंजूर
• विविध गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर
• स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी (उजनी दोन टीएमसी पाणी) १०० कोटी मंजूर
• नगरविकास विभागाकडून नगरपालिका हद्दीतील विविध कामांसाठी ८० कोटी रुपये मंजूर
■ शहरातील भुयारी गटार योजनेसाठी १४५ कोटी निधी मंजूर (पहिला टप्पा १६ कोटी)
• तालुक्यातील निरा उजवा कालव्यामधून वाढीव पाईपलाईन करण्यासाठी ६० कोटी रुपये मंजूर
• ग्रामविकास विभागाकडून २५१५ योजनेतून विविध कामांसाठी २५ कोटी रुपये मंजूर
• सामाजिक न्याय विभागाकडून तीन कोटी निधी मंजूर
• सोलापूर जिल्हा परिषदेकडून १८ कोटी रुपये निधी मंजूर • आमदार फंडातून विविध कामांसाठी १४ कोटी रुपये मंजूर
• जलसंधारण विभागाकडून विविध साठवण तलाव, बंधारे इत्यादी कामांसाठी १५० कोटी रुपये मंजूर
• संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे दोन हजार कोटींच्यावर विकास निधी मंजूर
भुयारी गटारी योजनेचे स्वप्न होणार पुर्ण
• मागील १२ वर्षापासून रेंगाळत असलेल्या सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळविली आहे.
आमदार शहाजी बापूंनी आपले राजकीय ताकद पणाला लावून शहरवासीयांचे भुयारी गटार योजनेचे स्वप्र पूर्णत्वास नेले आहे. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी
१६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. • सन २०११ पासून प्रलंबित असलेल्या सांगोला शहर भुयारी
गटारी योजनेच्या कामाला मंजूर मिळण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. सुरुवातीला ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या
या योजनेचा खर्च आता १२५ कोटी रुपयांपर्यंत गेला असून त्यामधील टप्पा क्रमांक १ च्या कामांना १६ कोटी ६३ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळविली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी आमदार शहाजीबापूंच्या मागणीला मान्यता देऊन निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
■ पहिल्या टप्प्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया क्षमता, विविध ठिकाणी सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था करणे जलशुद्धीकरण केंद्राजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणे
यामध्ये ट्रेकमेन, पंपिंग स्टेशन, जलशुद्धी केंद्र व नालाबंध ही कामे पूर्ण करण्यात येणार
असून दुसया टप्यामध्ये मल वाहिन्यांची व्यवस्था करून पहिल्या टप्यांमध्ये निर्माण केलेल्या मलप्रक्रिया व्यवस्थेस जोडण्यात येणार आहे.
0 Comments