धक्कादायक प्रकार...पतीने केला पत्नीचा आणि स्वतःच्याच मुलाचा खून, नक्की प्रकरण काय?
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीन मध्ये राहणाऱ्या नानूस वर्ड या दुकानाच्या मालक दीपक गायकवाड याने मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी औरंगाबाद येथून दीपक गायकवाडला ताब्यात घेतले आहे.
कल्याण : आराेपी दीपक गायकवाड याच्यावर जवळपास ८० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होता. त्यामुळे तो त्याच्या पत्नीकडे पैशाची मागणी करायचा.
पैशाच्या कारणावरुन तो पत्नीला घटस्फोट देणार होता. यावरुन त्यांचे वाद सुरु होते. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत होती. शुक्रवारीही त्यांची अशी भांडणे झाली. त्यावेळी पत्नी अश्विनी हीने त्याची कॉलर पकडली.
त्याचा राग पती दीपकला आला. त्याने रागाच्या भरात तिची गळा दाबून हत्या केली. पत्नीची हत्या केल्यावर मुलाला कोण संभाळणार यामुळे त्याने मुलगा आदीराज याचीही गळा दाबून हत्या केली.
कल्याणमध्ये व्यावसायिकाने आपल्या मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केली. फरार व्यावसायिक दीपक गायकवाड याला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. मयत मुलाचा आणि पत्नीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आला आहे.
मात्र मयत अश्विनी गायकवाडचे कुटुंबीय दीपक गायकवाडला आमच्या समोर आणा अशी ठाम भूमिक घेतली. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. पोलीस ठाण्यात जमा होऊन त्याने आरोपी दीपक याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
तर अश्विनी गायकवाडचा भाऊ विकी मोरे याने खुलासा केला आहे की, कशा प्रकारे पैशाकरीता अश्विनीला आणि तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीन मध्ये राहणाऱ्या नानूस वर्ड या दुकानाच्या मालक दीपक गायकवाड याने मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी औरंगाबाद येथून दीपक गायकवाडला ताब्यात घेतले आहे.
मयत अश्विनी गायकवाड हिचे कुटुंबिय कल्याणच्या रुक्मीबाई रुग्णालयात जमले आहेत. या ठिकाणी सात वर्थाचा आदिराज आणि त्याची आई अश्विनी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
कुटुंबियांची एकच मागणी आहे. क्रूर निर्दयी दीपक गायकवाडला आमच्या समोर आणा. ताेपर्यंत अश्वीनीच आणि आदीराजचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
कुटुंबीय आणि स्थानिक नागरीक महात्मा फुले पोलीस ठाण्यात जमा झाले. त्याठिकाणी त्यांनी दीपक गायकवाडला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली.
या वेळी अश्विनीचा भाऊ विकी मोरे यांनी खुलासा केला आहे की, कशा प्रकारे अश्विनीला पैशाकरीता त्रास दिला होता.
अश्विनीकडून पैशाची मागणी केली जात होती. आम्ही दीपक गायकवाडला वेळोवेळी पैसे दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाच लाख रुपये तिला दिले होते. तो हीच धमकी द्यायचा की पैसे दिले नाहीत
तर तुझ्यासह तुझ्या मुलाला मारुन टाकणार. अखेर त्याने तेच केले. या मानिसक छळात दीपक गायकवाड, आकाश सुरवडे, ज्योती दर्शन बागूल, सुनिता गायकवाड हे सर्व लोक समील असल्याने त्यांच्या विरोधाती कठोर कारवाई झाली पाहिजे.
0 Comments