google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील भयानक घटना...वृद्ध शेतकऱ्याची हत्या करून मुंडके पळवले, चार जणांविरुद्ध तक्रार दाखल

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील भयानक घटना...वृद्ध शेतकऱ्याची हत्या करून मुंडके पळवले, चार जणांविरुद्ध तक्रार दाखल

 सोलापूर जिल्ह्यातील भयानक घटना...


वृद्ध शेतकऱ्याची हत्या करून मुंडके पळवले, चार जणांविरुद्ध तक्रार दाखल

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

माढा तालुक्यातील शेवरे गावाच्या हद्दीतील कुरण वस्ती येथे शेतीच्या कारणावरुन 65वर्षीय शंकर प्रल्हाद जाधव या वृद्धाचा भावकीतील चौघाजणांनी कुऱ्हाडीने मुंडके तोडुन खून केल्याची घटना

 सोमवार 11 रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या या सुमारास घडली असून मयताचे मुंडके घेऊन आरोपी पसार झाले आहेत.

याबाबत पोलीसांकडुन मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि.11 रोजी सकाळी 10-30 वाजण्याच्या सुमारासम मयत शंकर प्रल्हाद जाधव यांचे डोळ्याचे तिन दिवसांपुर्वी ऑपरेशन झाले होते

 म्हणून ते घरी एकटेच झोपले होते. तेव्हा शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव या चौघांनी मिळुन शेतीच्या कारणावरून

 शंकर प्रल्हाद जाधव (65, राहणार कुरणवस्ती, शेवरे तालुका माढा जिल्हा सोलापूर) हे त्यांचे घरी जाऊन त्याच्या हातामधील कुऱ्हाडीने शंकर जाधव यांच्या गळ्यावर वार केला आणित्यांचे मुंडके शरीरावेगळे करून त्यांचा खून केला.

त्यानंतर आरोपी त्यांचे मुंडके सोबत घेऊन गेले आहेत. म्हणुन आरोपींविरुद्ध नरहरी नवनाथ बंडलकर (रा.शेवरे, ता. माढा) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सपोनि जोग करत आहेत.

Post a Comment

0 Comments