मोठी बातमी...जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार दिपकआबांची निवड
सांगोला : तालुका प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
जिल्ह्याचा सर्वांगीण विकासात सर्वात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर (डी.पी.डी.सी.)
विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य पाच जणांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने लेखी पत्राद्वारे माजी आमदार दीपक आबासह सर्वांचीनियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे गेली अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे राज्याच्या विधिमंडळात त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. अनेक वर्षे ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.
त्यांच्या निवडीमुळे रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल तसेच अनेक वर्षे या समितीवर काम करण्याचा अनुभव त्यांना काम करण्याचा अनुभव त्यांना असल्याने त्यांच्या अनुभवाचा समितीलाही नक्कीच लाभ होणार आहे.
0 Comments