google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर विधानसभा मतदारसंघांची मागणी नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे

Breaking News

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर विधानसभा मतदारसंघांची मागणी नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे

 सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर विधानसभा मतदारसंघांची मागणी 


नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन कार्यकारिणी काही दिवसांत जाहीर होईल. 

जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचे दौरे होतील.त्यानंतर जनतेचा कौल पाहून जिल्ह्यातील कोणकोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत, 

यासंदर्भातील माहिती तथा मागणी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली जाईल, असे नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नूतन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष श्री. साळुंखे यांनी पक्षाची आगामी वाटचाल, पक्ष संघटन यासंदर्भात माहिती दिली.

 यावेळी पक्षाचे राजेंद्र हजारे, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड, आप्पाराव कोरे, डॉ. बसवराज बगले, मल्हार शिंदे आदी उपस्थित होते.

दीपक साळुंखे-पाटील म्हणाले, जानेवारीत उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचा सोलापूर दौरा होईल. त्यावेळी पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्‌घाटन व कायकर्त्यांचा मेळावा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांगोला विधानसभेसंदर्भात 'नो कमेन्ट'

सांगोला विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत उमेदवार कोण असणार, ही जागा कोणत्या पक्षाकडे राहील, यासंदर्भात राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री. साळुंखे यांना विचारण्यात आला.

त्यावेळी ते म्हणाले, 'मी आता एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे, त्यामुळे त्यासंदर्भात सध्या काहीच बोलणार नाही.' त्यांनी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांवरही बोलणे टाळले.

पहिल्याच मेळाव्यात राजन पाटलांची बॅटिंग

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आज रंगभवन सभागृहात पहिलाच मेळावा पार पडला. यावेळी माजी आमदार राजन पाटील, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे,

शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, युवकचे जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेश पालवे, वसीम बुऱ्हाण, सुवर्णा झाडे, दिपाली पांढरे, राजेंद्र हजारे आदी उपस्थित होते.

यावेळी राजन पाटील यांनी उजनीच्या पाण्याचे काटेकोर नियोजन व अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची मजबूत संघटना बांधणी आवश्यक असल्याचे सांगितले.

 पक्षाच्या आडून कोणीही स्वत: मोठे होण्याचा प्रयत्न न करता पक्ष मोठा होईल, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments