google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना....भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने मारली रेल्वेखाली उडी !

Breaking News

खळबळजनक घटना....भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने मारली रेल्वेखाली उडी !

खळबळजनक घटना....भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने मारली रेल्वेखाली उडी !


भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने थेट रेल्वेखाली उडी मारू आत्महत्या केल्याची एक मोठी घटना समोर आली असून यामुळे भाजप कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख असलेल्या सुनील धुमाळ यांनी आज टोकाचे पाउल उचलले आहे.

 त्यांनी आज थेट रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या घटनेने भारतीय जनता पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे 

तर अनेकजण या घटनेने अस्वस्थ झाले आहेत. धुमाळ यांनी पुण्याच्या हडपसर परिसरात साडे सतरा नळी रेल्वे ट्रॅकवर, रेल्वेखाली उडी मारली आणि आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला आहे.

 हा प्रकार समोर येताच रेल्वे पोलीस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुनील धुमाळ यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.सुनील धुमाळ यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं

 असावं याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. अद्याप त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही परंतु पुढील तपास रेल्वे मार्ग पोलिस करत आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची आकस्मात नोंद केली आहे.

भाजप युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख सुनील धुमाळ यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करीत होते, त्यानंतर त्यांची नियुक्ती युवा मोर्चाच्या प्रदेश संपर्क प्रमुख पदावर करण्यात आली होती. धुमाळ हे भाजपचे सक्रीय कार्यकर्ते होते

 परंतु त्यांनी अचानक असा टोकाचा निर्णय का घेतला हे एक कोडे बनले आहे. धुमाळ यांनी अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केल्याने भारतीय जनता पक्षात एकच खळबळ उडाली असून, कार्यकर्ते देखील अस्वस्थ झाले आहेत. 

धुमाळ यांनी हा निर्णय कशासाठी घेतला हाच सवाल ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, आत्महत्येप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

Post a Comment

0 Comments