google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...अजित पवार, सुनिल तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर, नियोजनासाठी बैठक

Breaking News

मोठी बातमी...अजित पवार, सुनिल तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर, नियोजनासाठी बैठक

 मोठी बातमी...अजित पवार, सुनिल तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर, नियोजनासाठी बैठक


सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपूर अधिवेशन संपल्यानंतर सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. 

त्याचे नियोजनसाठी करण्यासाठी दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक आयोजित केल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी सांगितले.साळुंखे म्हणाले,

 राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातील पदाधिकारी नुकतेच निश्चित झाले आहेत. राज्यातील ऐतिहासिक राजकीय घडामाेडीनंतरची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करणे आणि वाढविणे बाबत विचार विनिमय होणार आहे.

 उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन कार्यालय शहरात सुरू झाले आहे. 

या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख व वेळ याचे नियोजन ठरविणे यासंदर्भातही बैठ होईल. शहरी व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांना या बेठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

छत्रपती रंगभवन सभागृहात मंगळवारी दुपारी ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी ग्रामीण भागातील अजितदादा समर्थकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन साळुंखे यांनी केले.

Post a Comment

0 Comments