google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...फ्लॅट देण्याचा आमिष दाखवून सांगलीतील महिलेवर मित्राच्या पत्नीवर दोघांचा पतीच्या मदतीने बलात्कार

Breaking News

खळबळजनक घटना...फ्लॅट देण्याचा आमिष दाखवून सांगलीतील महिलेवर मित्राच्या पत्नीवर दोघांचा पतीच्या मदतीने बलात्कार

  खळबळजनक घटना...फ्लॅट देण्याचा आमिष दाखवून सांगलीतील महिलेवर मित्राच्या पत्नीवर दोघांचा पतीच्या मदतीने बलात्कार


सांगली : सांगलीतील महिलेवर मुंबईच्या घाटकोपर परिसरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मुख्य म्हणजे या सर्व प्रकरणात तिचा पती देखील सहभागी होता. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या घाटकोपरच्या रमाबाई कॉलोनीत ही घटना घडली. इमारतीत फ्लॅट देण्याचा आमिष दाखवून मित्राच्या पत्नीवर दोघांनी बलात्कार केला. ही घटना 9 डिसेंबर ते 10 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. 

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर 2023 रोजी महिलेचा पती तिला घेऊन सकाळी पहाटे त्यांच्या परिसरातील एका नवीन बांधकाम केलेल्या इमारतीत घेऊन गेला. 

जिथे त्याने दोघांची मित्र म्हणून ओळख करून दिली. त्यांनी या इमारतीत फ्लॅट देण्याचे आमिष देत महिलेवर सामूहिक अत्याचार केला.

पीडित महिलेच्या पतीकडे घर भाडे देण्याचे पैसे नव्हते. त्याच्या दोन मित्रांनी त्याला पैसे देण्यासाठी होकार दिला ऐवज मध्ये त्यांनी त्याची पत्नीची मागणी शारीरिक सुखासाठी केली. 

महिलेच्या पतीने या साठी होकार दिला आणि पत्नीला घेऊन सकाळी पहाटे ठरलेल्या ठिकाणी आणले. आणि घटनास्थळी नेऊन पतीने पत्नीचे हातपाय बांधले नंतर पतीच्या दोन्ही मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले

या प्रकरणी महिलेने माहेरी सांगलीला जाऊन पतीच्या आणि त्याच्या दोन्ही मित्रांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली .

मात्र घटना पंत नगर हद्दीत घडल्यामुळे सांगलीच्या पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत हे प्रकरण पंत नगर पोलीस ठाण्यात पाठविले . महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोषींना कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments