google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी ; मा. आम. दिपकआबांची मागणी

Breaking News

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी ; मा. आम. दिपकआबांची मागणी

 अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतीपिके आणि फळबागांचे सरसकट पंचनामे


करून भरपाई द्यावी ; मा. आम. दिपकआबांची मागणी 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ;- आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपल्याने सांगोला तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, आंबा,  फळबागांचे आणि ज्वारी, मका तसेच पालेभाज्या या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली आहे.

सांगोला शहर आणि तालुक्यात सलग तीन ते चार दिवस अवकाळी पावसाने झोडपाल्याने डाळिंब द्राक्ष आंबा या फळबागा आणि रब्बी हंगामातील ज्वारी मका यासह तरकरी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे शेतातील उभी पिके कोलमडून पडली तर द्राक्ष पिकांना घडकुज कुजवा रोगांचा प्रादुर्भाव वाढला

 यामुळे नुकतीच प्राथमिक अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या. मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्याच्या बागांनाही ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे.

 मोहोर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. डाळिंब पिकालाही अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे.

चालूवर्षी सांगोला तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर झाला आहे.

 आधीच दुष्काळी परिस्थितीशी झगडत लाखो रुपयांचे महागडी खते, बियाणे आणि औषधे व्याजाने पैसे देऊन खरेदी करून कशाबशा जतन केलेल्या फळबागा अवकाळी पावसाने उद्दवस्त केल्याने

 सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभा राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून कोणत्याही जाचक अटी शर्ती न घालता

 सरसकट पांचामाने करून भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला आहे.

दूधदरात घसरण त्यातच अवकाळीचा तडाखा

संपूर्ण सांगोला तालुक्यातील अर्थव्यवस्था शेती आणि पशुपालन या दोन व्यवसायांवर अवलंबून आहे. आधीच दुधाच्या दरात प्रति लिटर तब्बल आठ ते दहा रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

 अशातच सांगोला तालुक्यातील फळबागा आणि पिकांना अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे.

 अशा वेळी शासन आणि प्रशासन दोघांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा रहावे.

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर

Post a Comment

0 Comments