google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार..सांगोला येथे बँकेच्या अधिकाऱ्यालाच 3 लाखाला फसविले

Breaking News

धक्कादायक प्रकार..सांगोला येथे बँकेच्या अधिकाऱ्यालाच 3 लाखाला फसविले

धक्कादायक प्रकार..सांगोला येथे बँकेच्या अधिकाऱ्यालाच  3 लाखाला फसविले


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- हल्ली फसवणुकीसाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. हल्ली बँकांची फसवणूक करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. 

अशीच एक फसवणुक सांगोला शहरात उघडकीस आली आहे. सोनेतारण कर्ज प्रकरण करायचे आहे. आम्हाला ज्वेलर्स दुकानातून सोने सोडवणे करीता

 तात्पुरते 3 लाख रूपये द्या, असे खोटे सांगून तीन लाख रूपयांची फसवणुक झाली असल्याची घटना गुरूवार दि.30 नोव्हेंबर रोजी

सांगोला येथे घडली. हर्षल पाटील, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही व त्याचा एक अज्ञात साथीदार यांच्यावर 

सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 किरण भोसले (सोनेतारण कर्ज कन्सलींग ऑफीसर) यांनी याबाबत

 शुक्रवारी दि.1 डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. दि.30/11/2023 रोजी सकाळी 11 वाजणेचे सुमारास एका बँकेत जीएलओम्हणून नेमणुकीस असलेले 

सचिन रोकडे हे एका इसमास घेऊन बँकेच्या सांगोला शाखेत माझ्याकडे आले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, यांना गोल्ड लोन पाहीजे त्यांना माहिती द्या.

 त्यावेळी त्या इसमाने त्याचे नाव हर्षल पाटील रा. दत्तनगर सांगोला असे सांगितले. मी सांगोला येथील एका ज्वेलर्स दुकानात माझे स्वतःचे 8 तोळे सोने तारण ठेवले

 असून ते मला तेथुन सोडवून घेऊन तुमच्या बँकेत सोने तारण कर्ज प्रकरण करायचे आहे असे सांगत सोने सोडवून घेणेकरीता माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही जर मला 3 लाख रूपये

 अॅडजेस करून दिल्यास मी तारण म्हणून ठेवलेले माझे सोने सोडवून घेऊन तुमच्या बँकेत सोनतारण कर्ज प्रकरण करून सोने तारण ठेवतो असे सांगितले.

त्यावेळी किरण भोसले यांनी स्वतःजवळचे दिड लाख रूपये व सचिन रोकडे यांचेकडून दिड लाख रूपये घेऊन हर्षल पाटील

 व त्याचे सोबत एक इसम त्यांचे मोटरसायकलीवर व मी माझे मोटर सायकल वर सोने सोडवून आणनेकरीता गेलो. 

त्यानंतर आम्ही एका हार्डवेअर दुकानाच्या समोर आलो असता हर्षल पाटील याने मला तेथे थांबवुन तुम्हाला सोनार ओळखेल, 

तुमच्या जवळचे पैसे माझ्या जवळ द्या ते मी सोनाराला देऊन सोने सोडवून घेतो, असे सांगितले. माझे कडील तीन लाख रूपये त्याचे जवळील पिशवीत घेतले. 

त्यानंतर आम्ही सर्वजण मोटार सायकल वरून पुढे चौडेश्वरी देवीचे मंदिरासमोर 11.40 वाजणेचे सुमारास गेलो असता

 तेथे मला बाजुला थांबवून ते दोघेजण ज्वेलरी दुकानात गेले होते. त्यानंतर दोन मिनींटानी ते बाहेर आले

 व त्यांची मोटर सायकल घेऊन वेगाने मणेरी चौकाकडे निघून गेले.मी माझे मोटर सायकल वरून त्यांचा जयभवानी चौकापर्यंत पाठलाग केला

 परंतू ते मिळून आले नाहीत. म्हणून मी परत ज्वेलरी दुकानात जावून मालकाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, 

सदर दोन इसमांनीमाझ्याकडे महाराजा अंगठी बाबत चौकशी केली असून त्यांचे कोणतेही सोने माझ्याकडे तारण नाही. यावरून सदर दोन इसमांनी माझी फसवणूक केली 

असल्याचे लक्षात आले, त्यानंतर इतर अधिकारी व कर्मचारी यांचेशी चर्चा करून 1 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments