खळबळजनक घटना.... शारीरिक संबंधास
नकार दिल्याने भयंकर कृत्य;
महिलेची हत्या करून ऊसाच्या फडाला लावली आग, कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या महिलेची हत्या करून मृतदेह उसाच्या फडात पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेची हत्या झाल्याची ही घटना घडली आहे. विधवा महिला हत्या प्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला आजरा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे.
विधवा महिलेसोबत नेमकं काय घडलं?
संबंधित महिलेच्या पतीचे निधन झालं आहे. ती आईसोबत भादवन येथे राहते. भादवन ते भादवनवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात योगेश याने या महिलेला ओढत नेले.
त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आशाताईने जोरदार विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिची गळा आवळून हत्या केला. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून उसाच्या फडाला आग लावली.
आग आटोक्यात आणण्याण्यासाठी योगेशचा आटापिटा सुरु होता. उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता.
त्यामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला नाही. या प्रकरणात गावातील कॉन्स्टेबल समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
0 Comments