google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात शासन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी

Breaking News

सांगोला शहरात शासन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी

 सांगोला शहरात शासन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी


विकसित भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. सदर संकल्प यात्रा कार्यक्रम सांगोला नगरपरिषद कार्यालय परिसरात पार पडल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली.

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेमध्ये केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे ही संकल्पना आहे. केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंतत्री स्वनिधी योजना, 

प्रधानमंत्री जन धन योजना, आयुष्मान भारत योजना सुकन्या समृब्दी योजना यांसारख्या विविध योजना राबविल्या जात आहेत.या योजनांच्या लाभपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये

 व तळागाळातील लोकांपर्यंत सदर योजना पोहोचाव्यात यासाठी केंद्र शासनामार्फत सर्व योजणांची माहिती देणारी चित्रफीत देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागात दाखविण्यात येत आहे.

सदर जनजागृतीपर सांगोला प्रांगणात योजनांची चित्रफित नगरपरिषद दाखविण्यात आली असून यावेळी विविध शासकीय योजनाचे स्टॉल

 नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आले होते व स्टॉलमार्फत या शासकीय योजनाबाबत जनजागृती करण्यात आली

 तसेच काही लाभार्थी यांना लाभही देण्यात मोठ्या संख्येने आला.खूप शहरातील नागरिकानी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली.

Post a Comment

0 Comments