google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आश्चर्यकारक... चिमुकली 14व्या मजल्यावरुन खाली कोसळली, खरचटलंही नाही; दोन गोष्टींनी वाचले प्राण

Breaking News

आश्चर्यकारक... चिमुकली 14व्या मजल्यावरुन खाली कोसळली, खरचटलंही नाही; दोन गोष्टींनी वाचले प्राण

 आश्चर्यकारक... चिमुकली 14व्या मजल्यावरुन खाली कोसळली, खरचटलंही नाही; दोन गोष्टींनी वाचले प्राण


देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याचीच प्रचिती मुंबईतील एका घटनेत आली आहे. 

मुंबईत इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून 13 वर्षीय मुलीला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.सखीरा शेख, असं या मुलीचं नाव आहे.

 मंगळवारी पहाटे कुर्ला येथील नेहरू नगर येथे ही घटना घडली. इतक्या उंचावरुन पडूनही मुलीला काहीच न झाल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मंगळवारी, दुपारी 12.30 च्या सुमारास, ती दिवाणखान्यात तिच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या भेटवस्तूंसोबत खेळत होती, तर तिचे आई-वडील आणि मोठी भावंडे हॉलमध्ये टीव्ही पाहत होते. 

तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, सखीरा दिवाणखान्याच्या खिडकीतून बाहेर काहीतरी पाहत होती. यादरम्यान तिचा तोल गेला आणि ती खिडकीतून खाली पडली. मुलीचे वडील इस्माईल शेख म्हणाले, 

‘आम्ही मोठा आवाज ऐकला. आधी आम्हाला वाटले की जवळून जाणाऱ्या डंपर ट्रकचा आवाज आहे. त्यांना त्यांच्या इमारतीच्या तळघरातून आवाज आल्याने ते खाली गेले 

असता त्यांना सखीरा जमिनीवर दिसली. तिथे गर्दी जमली होती. पण सखीरा लगेच सरळ बसून त्यांच्याकडे पाहू लागली. त्यांनी तिला ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, 

इस्माईल म्हणाले, जिथे ती इतक्या उंचीवरून पडल्याचे ऐकून डॉक्टर घाबरले. त्यांनी कुटुंबीयांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, “एवढ्या उंचीवरून पडूनही तिला कोणतीही दुखापत झालेली नाही हे पाहून येथील डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.” ते म्हणाले 

की, डॉक्टरांनी अंतर्गत दुखापतीची शक्यता नाकारली असून ते तिची प्रकृती बारकाईने तपासत आहेत. 

सखीरा पडताना एका झाडाची फांदी आणि पत्र्याच्या छप्पारावर आदळली. त्यामुळे ती थेट जमिनीवर पडण्यापासून वाचली. यामुळे तिच्या पडण्याचा वेगही कमी झाला. 

सध्या तिला कोणतीही बाह्य दुखापत दिसून येत नाही. सर्वसामान्यपणे व्यवहार असल्याने अंतर्गत दुखापत असल्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments