google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भारतीय संस्कृती महान आहे: अविनाश महाराज भारती सांगोला येथे ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश महाराज भारती यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

Breaking News

भारतीय संस्कृती महान आहे: अविनाश महाराज भारती सांगोला येथे ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश महाराज भारती यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

 भारतीय संस्कृती महान आहे: अविनाश महाराज भारती सांगोला येथे ओम माने


यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश महाराज भारती यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )

सांगोला/ प्रतिनिधी: भारत देशामध्ये सर्वत्र विविधता आढळून येते. ज्येष्ठ माणसातच आज तरुण दिसतोय. भारतासारखा देश व महाराष्ट्रासारखे राज्य इतर कोठेही नाही.

 आई, वडील व गुरुजन यामध्ये भारतीय संस्कृती सामावलेली आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात महान संस्कृती मानली गेली आहे. संविधानामुळे व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही अस्तित्वात आली.  

 थोर महात्म्यांचा इतिहास हा सर्वांसाठी क्षणोक्षणी मार्गदर्शकाची भूमिका बजावतो आहे. असे विचार थोर व्याख्याते ह .भ.प.अविनाश महाराज भारती आंबेजोगाई यांनी सांगोला येथे व्यक्त केले. 

सांगोला शहराच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व माजी नगरसेवक आनंदा माने यांचे चिरंजीव ओम माने यांच्या  वाढदिवसानिमित्त सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी  आयोजित

 केलेल्या भारतीय संस्कृती व आजची तरुणाई या विषयावरील व्याख्यानामध्ये  अविनाश महाराज भारती यांनी आपले विचार व्यक्त केले.

 सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ह. भ .प .अविनाश महाराज भारती, माजी नगराध्यक्षा राणीताई माने, माजी नगरसेविका छायाताई मेटकरी ,धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष काशिलिंग गावडे, चेअरमन तायप्पा माने ,

ज्ञानेश्वर गाडेकर,ओम माने यांच्या हस्ते पूजन करण्यात आले .त्यानंतर व्यासपीठावर चेअरमन तायाप्पा माने यांच्या हस्ते ह. भ .प .अविनाश महाराज भारती यांचा विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .

या कार्यक्रमासाठी  ॲड. महादेव पारसे , धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय जानकर ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शिंदे

 ,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रदीप मिसाळ, प्रताप इंगोले तसेच विविध क्षेत्रातील  मान्यवर पदाधिकारी व श्रोतावर्ग यांची उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना अविनाश महाराज भारती म्हणाले भारतीय संस्कृतीला थोर असा इतिहास आहे. पूर्वीचा इतिहास आज आपल्या पिढीला मार्गदर्शक ठरत आहे .

ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवणे यात माने कुटुंबाचे वेगळेपण व मोठेपण आहे .असे विचार व्यक्त करीत स्त्रोता वर्गाला त्यांनी बौद्धिक मेजवानी दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी चव्हाण इंदापूर यांनी केले. 

Post a Comment

0 Comments