google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची आज होणार निवडणुक

Breaking News

सांगोला तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची आज होणार निवडणुक

 सांगोला तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची आज होणार निवडणुक


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- सांगोला तालुक्यासांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडलेली असून यामध्ये सावे खवासपूर 

चिकमहुद ग्रामपंचायतीची मुदत संपली असल्यामुळे या तीन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे

     सावे ग्रामपंचायतीमध्ये एकूण 11 सदस्य संख्या व एक लोकनियुक्त सरपंच असे एकूण 12 प्रतिनिधीत्व असलेल्या सावे ग्रामपंचायत मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे शेजाळ गटाचे लोक नियुक्त सरपंच शिवाजीराव वाघमोडे व नऊ सदस्य असून

 विरोधी पक्षाचे देवकते गटाचे दोन सदस्य निवडून आलेले आहेत सावे ग्रामपंचायत मध्ये शेजाळ गटाचे वर्चस्व असून त्या गटाचा उपसरपंच होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे तसेच

 खवासपूर ग्रामपंचायतींमध्ये 1 लोकनियुक्त सरपंच व 11 सदस्य संख्याबळ असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे लोकनियुक्त सरपंच गणेश दिक्षित व दहा ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत विरोधी शिवसेना पक्षाचें एकच जागा निवडून 

आल्याने खवासपूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार निवडून येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे तर सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्या

 चिकमहुद गावच्या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीचे लोकनियुक सरपंच शोभा कदम व13 सदस्या पैकी 11 सदस्य विजयी झाल्या मुळे शिवसेना राष्ट्रवादी युतीचाच उपसरपंच होणार असल्याचे चिन स्पष्ट होत आहे

वाढेगांव उपसरपंचपदाची निवडणुक 22  होणार डिसेंबरला

वाढेगांव ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली असुन त्यामध्ये शेकाप शिवसेना युतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ कोमल सुरेश डोईफोडे आणि 13 सदस्या पैकी 7 सदस्य शेकाप

 शिवसेना युतीचे विजयी झालेले असून माजी सरपंच नंदकुमार दिघे यांच्या राष्ट्रवादी  शिवसेना युतीस सहा जागा वर विजय मिळाला आहे.

 वाढेगांव ग्रामपंचायतीची मुदत 23 डिसेंबर रोजी संपणार असल्याने वाढेगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक ही 22 डिसेंबरला होणार आहे

Post a Comment

0 Comments