google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात कोळा परिसरात अवैध सावकारी बोकाळली... जमिनी बळकवणाऱ्या सावकारावर सावकारकीचे गुन्हे दाखल करण्याची जनतेची मागणी

Breaking News

सांगोला तालुक्यात कोळा परिसरात अवैध सावकारी बोकाळली... जमिनी बळकवणाऱ्या सावकारावर सावकारकीचे गुन्हे दाखल करण्याची जनतेची मागणी

 सांगोला तालुक्यात कोळा परिसरात अवैध सावकारी बोकाळली... जमिनी बळकवणाऱ्या सावकारावर सावकारकीचे गुन्हे दाखल करण्याची जनतेची मागणी


सांगोला तालुक्यातील कोळा परिसरात गेल्या अनेक दिवसापासून खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात सुरू असून गोर गरीब जनतेला नाहक त्रास देऊन जमिनी 

तारण घहान फसवेगिरी खरेदी खत करून घेतलेले असल्याचे निदर्शनास येत आहे जमिनी बळकवण्याचा उद्योग मोठा असल्याचे दिसून येत आहे

 संबंधित खाजगी सावकाराच्या मुसस्क्या आवळून सावकारी चे गुन्हे दाखल करणे गरजेचे बनले आहे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष

देणे गरजेचे आहे. सध्या दुष्काळजण्य परिस्थीती असून जनावरांना चारा पाणी व मजुरांचा हाताला काम नसल्यामुळे आणि शेतीत पडलेल्या नापिकी मुळे ग्रामिण भागात हात आखडता आसल्याने अनेक उदयोग धंदे चालकांचे कमंबरडे मोडले आहे.

 अशातच ग्रामिण भागात अवैध सावकारी व्यवसाय फोफावत असून अनेकांना या सावकारी व्यवसायाचा फास आवळला जात आहे.

 सर्वत्र दुष्काळ पडत असूनपडणाऱ्या अत्य अल्प प्रजन्यवृष्टी मुळे निसर्गाचे चक्र कोलमाडले आहे. शेतात टाकलेला खर्च तर सोडाच पण मशागतीचे मोल सुध्दा निघत नसल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. 

उलट या वर्षी तरी काळी आई भरभरून देईल या आशेवर जमिनीत दाणा - पाणी, खत टाकून सर्व सामान्य शेतकरी मोकळा होत होता पण अत्यल्प पडणारे पावसाचे पाणी आले तसे गेले बळीराजा संकटात सापडला

 त्यामुळे बाजार पेठेत आर्थिक उलाढाल मंदावली यामुळे लहान मोठे उद्योग धंदे व्यावसायीक डबघाईला आले. त्यात उदयोजकांचा खर्च मात्र तसाच सुरू असल्यामुळे अनेक पानटपरी धारक, हॉटेल

 धारक, किराणा दुकानदार, यासह अनेक लहान मोठे उद्योग धोक्यात आले • इमारत भाडे, लाईट बील, मजुरांचा पगार व इतर खर्च पहाता उदयोग मालकाला डोईजड झालेत. 

तर दुसरीकडे जमिनी घाण घेतलेली सावकार मात्र यांची सावकारकी जोरात सुरू आहे सावकारांनी अनेक लोकांच्या जमिनी लुबाडल्या आहेत लोकांना लुबाडण्याचा उद्योग सुरूअसल्याचे चित्र दिसत आहे 

खाजगी सावकारावर कारवाई करावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. अशा अवैध सावकारी करणाऱ्या इसमांचे जाळे आता बाढत असून दुष्काळ हे त्याला मुख्य कारण आहे.

शेती, बैलजोडी, चिज वस्ता, घर, जमिन गहाण ठेवून असे व्यवाहार केले जातात तर काही जणांनकडून बँक धनादेश कोरे ज्यावर रक्कम न लिहीता 

वेळेवर रक्कम लिहून बँकेत टाकून पैसे काढता येईल व पैसे न मिळाल्यास धनादेश अनादर प्रकरणी दावा दाखल करता येईल अशी व्यवस्था प्रथमच करून ठेवली

 असल्याने कर्जदार मुकाट पणे व्याज-व्याज दरमहा फेडत असतो. ग्रामिण भागात असे अनेक प्रकार घडत आहे. त्यामुळे या अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्ती कार्यवाही पासून दुर असतात. 

असाच काहीसा प्रकार कोळे भागात जोरात सुरू असून गुन्हे शाखेने माहिती देणाराचे नाव गोपनिय ठेवून अशा अवैध सावकारांची माहिती जमा करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी पुढे येत आहे.

Post a Comment

0 Comments