google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात चोरी; ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला चोरट्यांनी

Breaking News

सांगोला शहरात चोरी; ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला चोरट्यांनी

 


सांगोला शहरात चोरी; ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला चोरट्यांनी


सांगोला (प्रतिनिधी) :- घराच्या दरवाज्याचे कुलुप कोयडा तोडुन आत प्रवेश करून ३५ हजार रुपये किंमतीचे रोख रक्कम, 

सोने चांदीचे दागिने व शेजारील कॉलनीतील कंपाऊडच्या आतमधील ३० हजार रुपये किमंतीची 

मोटार सायकल असा एकुण ६५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला असल्याची घटना दि. १६ / ११ / २०२३ रोजी रात्रीच्या

 सुमारास महुद रोड वरील गुळमिरे कॉलनी येथे घडली. चोरीची फिर्याद उज्ज्वला कुंभार यांनी दिली आहे.

अज्ञात चोरट्यांनी रोख १५ हजार रुपये, १५,००० हजार रू. किंमतीच्या ३ ग्रॅम वजनाच्या 

सोन्याच्या कानातील रिंगा , ५ हजार रुपये किंमतीचे ५ भाराचे दोन पंजनाचे जोड व २ भाराचे एक ब्रासलेट व ३० हजार रुपये किंमतीची

 मोटार सायकल असा एकुण ६५ हजार रुपये किमंतीची मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments