धक्कादायक प्रकार..सांगोला येथे परप्रांतीय कामगारांचा दुदैर्वी अंत
सांगोला (प्रतिनिधी) : - सांगोला बस डेपो येथील सार्वजनिक शौचालयातील १ कामगारांचा मृत्यू झाला असल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी ५ वाजणेचे सुमारास घडली. देवकांत अमीरलाल पाठक,
बिहार असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव आहे. फिर्याद मुलासिंग स्वरगियलाल बिहारीसिंग वय ५० वर्षे रा. मुळ गाव खजुली ता. सराई जि. बिहार सध्या रा. सांगोला बस स्टॉड सांगोला ता. सांगोला यांनी दिली.
फिर्यादी व देवकांत पाठक हे सांगोला बस डेपो येथील सार्वजनिक शौचालयात नोकरी करत होते. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी देवकांत हा आराम करण्याच्या खोलीत होता.
त्यानंतर ०५ वाजणेचे सुमारास फिर्यादी व देवकांत यांनी चहा पिल्यानंतर दोघांचे जेवण बनवण्यासाठी देवकांत हा रुमवर गेला. त्यानंतर त्यास फोन केला असता ते फोन उचलत नाहीत. म्हणुन वरती जावुन पाहिले तेव्हा ते मांडी घालून खाली बसले होते.
त्यांना आवाज देवुनही ते उठत नाहीत म्हणुन जवळ जावुन पाहिले असता त्यांचे शरिर थंड पडले होते. थोडा अंदाज आल्यामुळे जवळच असलेल्या कंट्रोल केबीन मधील एस. टी. महामंडळाचे अधिकारी आले.
त्यानंतर ग्रामीण रुग्नालय सांगोला येथे उपचारास दाखल केले असता तो उपचापुर्वी मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
0 Comments